आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाद्वारे होणार 334 ठिकाणी ‘मन की बात’, स्थायीचे सभापती तुषार भारतीय यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकेकडून शहरात एकाच दिवशी ३३४ ठिकाणी मन की बात’ घेतल्या जाणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी शनिवारी (१५जुलै)पत्रकार परिषदेत दिली. महिन्याच्या अंतिम रविवारी ३० जुलैला सकाळी ११ ते ११.३० दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमात ३० हजार नागरिकांचा सहभाग राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे नागरिकांसोबत थेट संवाद साधण्यासाठी ‘मन की बात’ हा अनोखा कार्यक्रम राबविला जातो. अर्धा तासाच्या या उपक्रमांत प्रधानमंत्री देशाचा विकास, नवीन याेजना तसेच विविध घटनांबाबत नागरिकांना माहिती देतात. ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू झालेल्या पहिल्या प्रसारणापासून आतापर्यंत ३३ संस्करण प्रसारीत झाले आहे. या कार्यक्रमाचे आकाशवाणीकडून स्थानिक भाषांमध्ये भाषांतरही प्रक्षेपित केले जाते. प्रधानमंत्र्यांकडून केले जाणारे ३४ वे प्रसारणाच्या निमित्याने महापालिकेकडून हा उपक्रम राबविला जात आहे.

या उपक्रमात नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, व्यापारी, तरुण विद्यार्थी, सामाजिक संघटना यांना सहभागी होण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन महापौर संजय नरवणे यांनी केले. सार्वजनिक विषय असल्याने शहराची वेगळी परंपरा सुरू होण्याच्या दृष्टिने हा उपक्रम राबविला जात असल्याचे आयुक्त हेमंत पवार यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला महापौर संजय नरवणे, आयुक्त हेमंत पवार, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समिती सभापती तूषार भारतीय, पक्षनेता सुनील काळे उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...