आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी माओवादी नेते भट्टाचार्य अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या केंद्रीय समितीचे माजी सदस्य व पूर्वाश्रमीचे माओवादी नेते तुषार कांती भट्टाचार्य यांना मंगळवारी गुजरात पोलिसांनी गोंदिया वनागपूरदरम्यान अटक केली.

भट्टाचार्य हे मंगळवारी गीतांजली एक्सप्रेसने कोलकाताहून नागपुरात येत असताना गोंदिया ते नागपूर दरम्यान सुरत पोलिसांच्या  पथकाने त्यांना अटक केली. त्यांना विमानाने मुंबईला नेले असून, तेथून त्यांना सुरत येथे नेण्यात येणार आहे. बुधवारी त्यांना सुरत येथील न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती  माहिती सूत्रांनी दिली. ६२ वर्षीय भट्टाचार्य यांच्याकडे अनेक वर्ष उत्तर प्रदेश, उत्तराखंड तसेच उत्तर बिहार विभागाची माओवादी संघटनेची जबाबदारी होती. सध्या ते नागपुरातच पत्नी प्रा. शोमा सेन यांच्यासह राहत होते. भट्टाचार्य यांच्याविरुद्ध सुरत न्यायालयाने २०१० मधील एका प्रकरणात वॉरंट जारी केला होता. माओवादी विचारांच्या प्रसाराशी संबंधित ते प्रकरण होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. भट्टाचार्य तरुण वयात पूर्वाश्रमीच्या आंध्र प्रदेशातील तेलंगणा परिसरात सक्रीय होते. त्यांच्या कारवायामुळे २००७ ते २०१३ या कालावधीत त्यांना वारंगल कारागृहात ठेवले होते. 
बातम्या आणखी आहेत...