आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

52 पोलिसांच्‍या हत्‍यांचा मास्टरमाईंड आयतू अटक, नावावर होते 45 लाखांचे बक्षीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडचिरोली - महाराष्‍ट्र, तेलंगणा, छत्‍तीसगडमध्‍ये दहशतीचे दुसरे नाव म्‍हणून ओळख असलेला गडचिरोली जिल्‍ह्यातील माओवादी कारवायांचा प्रभारी कमांडर आयतू उर्फ अशोक गजर याला तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे. तो स्‍वत:च पोलिसांना शरण गेल्‍याचे बोलले जात आहे.
आयतू हा तेलंगणामधील वारंगल जिल्‍ह्याचा मूळ रहिवासी आहे. 2009 मध्‍ये गडचिरोली येथे झालेल्‍या नक्षलवादी हल्‍ल्यात 52 पोलिस जवान शहीद झाले होते. या हल्‍ल्‍याचा मास्‍टरमाईंड आयतूच होता. त्‍याने केलेल्‍या विघातक कारवायांमुळे त्‍याच्‍यावर 50 लाख रूपयांचे बक्षीस ठेवले होते. गडचिरोली जिल्‍ह्यात त्‍याची प्रचंड दहशत होती.

आयतू गडचिरोली जिल्‍ह्याचा कमांडर होता. जिल्‍ह्यात झालेल्‍या जहाल माओवादी कारवायांचा त्‍याने कट रचला होता. या कारवायांमध्‍ये कंपनी चार आणि दहाचा समावेश आहे. आयतू हा या गटांचा सर्वेसर्वा होता, अशी माहिती आहे. गडचिरोली जिल्‍ह्यातील तीन मोठ्या घटनांच्‍या तपासात पोलिसांना आयतू हवा होता. त्‍याने लाहेरीत 17, मरकेगांवमध्‍ये 14 आणि हत्‍तीगोटामध्‍ये 15 पोलिसांची घातपात करून हत्‍या केली होती. धानोरा तालुक्‍यात लोकसभा निवडणुकीदरम्‍यान झालेल्‍या तीन पोलिसांच्‍या हत्‍येमागेही त्‍याचाच हात असल्‍याचे बोलले जात आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा , आयतूसंदर्भात या बाबी..