आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांची वाहने स्फोटाने उडवण्याचा नक्षलींचा डाव उधळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात भूसुरुंगाच्या माध्यमातून पोलिसांची वाहने उडवून देण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडत स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला. कुरखेडा तालुक्यात मालेवाडा पोलिस मदत केंद्रांतर्गत मरमा गावाजवळ नक्षलविरोधी अभियानाचे पथक शोध मोहीम राबवत होते. त्या वेळी खातमळा ते मरमा या मार्गावरील नाल्याच्या पुलावर नक्षलवाद्यांनी स्फोटके पेरल्याचे लक्षात आले. पथकाने लगेच सावधगिरी बाळगून ४ किलो वजनाचा भूसुरुंग जागेवरच निकामी केला. घटनास्थळावर लोखंडी क्लेमोर माइन्स, स्फोटासाठी वापरले जाणारे पाच किलो पावडर, जिलेटीनच्या कांड्या, बॅटरी, वायर, रेडिओ या साहित्यासह देशीकट्टा व इतर साहित्य जप्त करण्यात आले. कुरखेड्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित फस्के यांच्या मार्गदर्शनाखाली मालेवाडा पोलिस मदत केंद्र, गडचिरोली येथील पोलिस महानिरीक्षक कार्यालय, क्यूआरटी, बॉम्बशोधक व नाशक पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.