गडचिरोली - येथील भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रांतर्गत येणारे घोडपाडी गाव अजूनही दहशतीत आहे. या गावातील 40 वर्षीय पोलीस पाटील पिळू पुंगाटी यांची नक्षलवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी क्रुर पद्धतीने हत्या केली. या घटनेमुळे गावात अजूनही भीतीचे सावट असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
अशी केली हत्या
पिडू पुंगाटी हे घरी मध्यरात्री झोपेत असताना सुमारे 15 ते 20 सशस्त्र नक्षल्यांनी त्यांना झोपेतून उठवले. ते पोलिसांना माहिती देत असल्याचा नक्षल्यांचा संशय होता. त्यामुळे त्यांना बाहेर चौकात नेऊन गोळया झाडून त्यांची हत्या करण्यात आली.
पोलिस मित्रांचे धाबे दणाणले
पोलिस मित्र आणि पोलिस पाटील यांच्या खूनाचे सत्र येथे थांबायलाच तयार नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पुन्हा पोलिस पाटील यांची हत्या झाल्याने पोलिसांना सहकार्य करणा-यांचे धाबे दणाणले आहे. सशस्त्र नक्षल्यांनी पोलिस पाटलांच्या हत्येनंतर धमकी दिली की, पोलिसांना मदत केली तर, असे हाल करण्यात येतील.
पुढील स्लाइड्सवर वाचा घटनास्थळी फेकली होती पत्रके, पोलिस काय म्हणतात..