आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍याच्‍या 3 विद्यार्थ्‍यांची गडचिरोलीत वैद्यकीय चाचणी, नक्षल्यांनी बांधले होते हातपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - भारत जोडो मोहिमेसाठी पुण्‍यातून छत्‍तीसगडला सायकलीवरून निघालेल्‍या तीन युवकांची नक्षलवाद्यांच्‍या तावडीतून सुटका झाली, त्‍यानंतर आज या विद्यार्थ्‍यांना गडचिरोलीमध्‍ये आणण्‍यात आले आहे. हे तिघेही विद्यार्थी असल्‍याचे समजल्‍यानंतर नक्षलवाद्यांनी त्‍यांना सोडले. या तिघांची वैद्यकीय चाचणी करण्‍यात आली असून, ते फीट
असल्याचे सांगण्‍यात आले आहे.
काय आहे प्रकरण
आदर्श पाटील, विकास वाळके, श्रीकृष्ण शेवाळे हे तीन विद्यार्थी पुण्यात शिकत होते. भारत जोडो अभियानाच्या सायकल रॅलीमध्‍ये त्‍यांनी सहभाग घेतला होता. पुणे ते ओडिशाच्या मलकानगिरीपर्यंत ही सायरल रॅली जाणार होती. मात्र छत्तीसगडमध्ये या विद्यार्थ्यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. पोलिसांचे खबरे असल्‍याच्‍या संशयाने या विद्यार्थ्‍यांचे
अपहरण झाले होते.
असे झाले अपहरण
23 डिसेंबर 2015 रोजी हे तिघेही नागपूर येथून निघून गडचिरोली जिल्ह्य़ातील हेमलकसा येथे पोहोचले. तेथून त्‍यांनी पुढील प्रवासाला सुरूवात केली. छत्तीसगडच्या बिजापूरहून 29 डिसेंबरला बसेगुडा येथे पोहोचले असता सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्यांचे अपहरण केले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा.., कोण आहेत हे विद्यार्थी, काय शिकत आहेत..
आदिवासींच्‍या जीवनाच्‍या अभ्‍यासाचा छंद, कशी झाली दौ-याला सुरूवात..