आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maps Approval Through Construction Of Electronic System

बांधकाम नकाशांची मंजुरी इलेक्ट्रॉनिक यंत्रणेमार्फत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - बांधकामांचे नकाशे मंजूर करण्यात अधिकाऱ्यांकडून होणारी दिरंगाई लक्षात घेऊन अाता नकाशे मंजुरीसाठी मानवी हस्तक्षेपविरहित, अशी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा विकसित करण्याचे काम नगरविकास विभागात सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात दिली. नागपूरकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित समाधान शिबिराच्या उद््घाटन सत्रात ते बाेलत हाेते.
जागांचे नकाशे मंजूर करण्यासाठी नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो, याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, ‘नकाशे मंजुरीसाठी लागणारा विलंब ही मोठी समस्या आहे. त्यात अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर ऐच्छिक अधिकार आहे. ते अधिकार संपवण्यासाठी आता नगरविकास विभागात बीम या तंत्रज्ञानाचा वापर करून इलेक्ट्रॉनिक यंत्रणा विकसित करण्याचे काम सुरू आहे. या तंत्रज्ञानात कुठूनही एखादी वस्ती, त्या वस्तीतील नागरी सुविधा, त्या वस्तीतील नेमकी इमारत अथवा ठिकाणाची त्रिमितीय प्रतिमा (थ्रीडी इमेज) संगणकावर उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे अधिकाऱ्यांचा अनावश्यक हस्तक्षेप थांबण्यास मदत होणार आहे. हे तंत्रज्ञान महापालिकांनाही देणार आहोत. यापूर्वी महापालिकांना ऑटोकॅड तंत्रज्ञान पुरवले गेले होते. मात्र, पालिकांच्या अधिकाऱ्यांनी त्याचा वापरच होऊ दिला नाही. त्यामुळे मंजुरीच्या फायली अधिकाऱ्यांकडेच गेल्यात. आता यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी पाठवण्याचे धोरण राहील’, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

वंचित घटकांच्या विकासाला प्राधान्य
सामाजिक कार्यातील संस्थांनी वंचितांसाठी सुरू केलेली लढाई यापुढेही प्रभावीपणे सुरू ठेवावी. शासन पाठीशी खंबीरपणे उभे राहील. वंचित घटकांच्या विकासाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी रविवारी दिली.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बाेलत हाेते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री म्हणाले की, गरीब जनतेपर्यंत किती विकास पोहोचला याचे मूल्यमापन करताना विकासापासून कोणीही वंचित राहणार नाही, यासाठी प्रभावी व परिणामकारक योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. लंडन स्कूलमध्ये डॉ. आंबेडकरांच्या नावाने अध्ययन कक्ष सुरू केला जाणार असल्याचे ते म्हणाले. तर अण्णाभाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहार दूर करून ते महामंडळ १५ ऑगस्टपासून सुरू करण्याचा मानस राज्यमंत्री कांबळे यांनी व्यक्त केला.