आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेल्यात अन्यायाविरुद्ध एकवटला मराठ्यांचा हुंकार, पाहा मोर्चाचे 20 फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - ‘पुन्हा नको अब्रूची लूट, उगारू या कोटी जनांची वज्रमूठ.... माता-भगिनींच्या रक्षणाला सरसावले लक्ष-लक्ष बाहू, कोपर्डीच्या लेकीला आज श्रद्धांजली वाहू.... नको पुन्हा कोपर्डी नको पुन्हा अत्याचार, अन्यायाविरुद्ध एकवटला हा कोटी मनांचा हुंकार... काेपर्डीतील अामची पाेरगी गेली जीवाशी नराधमाला अाता द्या तत्काळ फाशी’ शा घोषणांचे फलक हाती घेऊन सोमवारी कोपर्डी अत्याचाराच्या निषेधार्थ मराठा महाक्रांती मूकमोर्चा काढण्यात आला.

मराठवाडा, खान्देशानंतर विदर्भातील पहिला माेर्चा अकाेल्यात काढण्यात अाला. माेर्चात लाखाेंचा जनसमुदाय लाेटला हाेता. सुमारे १४ लाख २० हजारांपेक्षा जास्त मोर्चेकरी सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. मराठा क्रांती माेर्चा काेणत्याही जातीविराेधात नसून, व्यवस्थेविराेधात अाहे, असे अायाेजकांतर्फे स्पष्ट करण्यात अाल्याने इतर समाजानेही माेर्चाला पाठिंबा दिला हाेता. साेमवारी १२ वाजताच्या सुमारास अकाेला क्रिकेट क्लब येथून मूकमोर्चा निघाला. सकाळपासूनच अकाेला जिल्ह्यातील मराठा बांधव-भगिनी मैदानावर येण्यास सुरुवात झाली. माेर्चा टाॅवर चाैक, मदनलाल धिंग्रा चाैक, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने काढण्यात अाला. या मूकमाेर्चामध्ये घाेषणा अथवा नारेबाजी करण्यात अाली नाही. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तगडा पाेलिस बंदाेबस्त तैनात केला हाेता.

जिजाऊ वंदन करुन सांगता
मराठा क्रांती माेर्चात प्रथम युवती, महिला, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, पुरुष अाणि शेवटी युवक सहभागी झाले हाेते. १० युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर युवतींनी निवेदनाचे वाचन केले. जिजाऊ वंदना व राष्ट्रगीताने माेर्चाची
सांगता झाली.

उपस्थितीचे दावे
अायाेजक : १४ लाख २० हजार
पाेलिस : २ लाख २५ हजार
असे हाेते स्वयंसेवक
३ हजार पुरुष अाणि ५०० महिला स्वयंसेवक.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, अकोल्‍यात एकवटले होते लाखो मराठा बांधव..
अखेरच्‍या स्‍लाइडवर पाहा व्‍हिडियो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...