आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात मराठा समाजाचा भव्य मूक माेर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- उपराजधानी नागपूर शहरात मंगळवारी सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य मूकमाेर्चा काढण्यात अाला. या माेर्चात माजी िवदर्भवीर जांबुवंतराव धोटे, माजी मंत्री रणजित देशमुख, माजी आमदार सुनील शिंदे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुनील लोंढे, माजी कुलगुरू शरद निंबाळकर आदी नेते सहभागी झाले होते.

दरम्यान, सुमारे लाखांवर लाेक माेर्चात सहभागी असल्याचा दावा अायाेजकांनी केला अाहे, तर पाेलिसांच्या मते १५ हजार माेर्चेकरी हाेते.

काेपर्डीतील नराधमांना फाशी द्यावी, कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी अॅट्राॅसिटी कायद्यात सुधारणा करण्यात यावी, शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात आदी मागण्यांचे फलक माेर्चेकऱ्यांच्या हाती हाेते. गौरी शिंदे आरती भोसले या युवतींनी जिजाऊ वंदना करून तसेच काेपर्डीतील पीडित मुलीला श्रद्धांजली वाहिल्यानंतर माेर्चाला सुरुवात झाली. जयसिंगराव चव्हाण सर्वात समोर होते. त्यांच्या मागे पाच-पाचच्या रांगेत मुली, त्यांच्या मागे महिला, रुग्णवाहिका नंतर पुरुष अशी रचना होती. राजघराण्याचा सहभाग हे या मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले.

संग्रामसिंग राजे भाेसले, जयसिंगरावराजेे, मुधोजीराजे, उधोजीराजे, रघुजीराजे भाेसले, यशोधराराजे भोसले, मृणालिनीराजे भाेसले, मोहिनीराजे भाेसले, वसुंधराराजे भाेसले, वासंतीराजे भाेसले आदी मोर्चात सहभागी झाले होते.

कुणबी समाजाची पाठ
मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असल्यामुळे नागपूरच्या माेर्चाकडे राज्याचे लक्ष हाेते. मात्र, या मोर्चाच्या अायोजनाबाबत काही वाद होते. िवदर्भात मराठ्यांपेक्षा कुणबी समाजाची संख्या माेठी अाहे. त्यामुळे ‘कुणबी- मराठा’ एकत्र मोर्चा काढावा, असा एक मतप्रवाह होता. मात्र बराच खल झाल्यानंतर सकल मराठा समाज म्हणूनच मोर्चा काढायचे ठरले. परिणामी कुणबी समाजाने या माेर्चात सहभागी हाेण्याची भूमिका घेतली. त्याचा परिणाम गर्दीवर दिसून अाला.
बातम्या आणखी आहेत...