आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चात दीडशेहून अधिक MLA सहभागी, नागपुरात CM कडे सादर केले निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मराठा आरक्षणाच्या मागणीवर राज्यात निघालेल्या विक्रमी मोर्चांनंतर बुधवारी उपराजधानीत सकल मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात दीडशेहून अिधक सर्वपक्षीय मराठा आमदारांसह राज्यभरातून लोक सहभागी झाले होते.

बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील मोर्चाला सामोरे गेले. त्यांनी पाच मुलींच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्याशी भेट घालून दिली. मुलींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन चर्चा केली. ‘आम्ही पहिल्यांदाच राजकीय नेत्याकडे आलोय. आम्हाला रिकाम्या हाताने पाठवू नका आणि मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या. अन्यथा पुढील निवडणुकीत सरकारला बॅलेटने उत्तर मिळेल’ असा इशारा या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिला. त्यावर ‘तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही’, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.

यापूर्वी निघालेले विक्रमी संख्येचे मोर्चे पाहता उपराजधानी नागपुरात विधिमंडळावर निघणारा मोर्चाही प्रचंड राहील, हा अंदाज मात्र चुकला. मोर्चाला अपेक्षित गर्दी झाली नाही. विधिमंडळावर मोर्चा निघणार म्हटल्यावर काही लाखांची गर्दी होईल, असे अपेक्षित असल्याने नागपूर पोलिसांनीही व्यवस्थापनासाठी प्रचंड फौजफाटा ठेवला होता. केवळ मोर्चासाठी दोन हजारांवर पोलिसांना तैनात करण्यात आले. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठीही मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

मोर्चाचा थांबापॉइंट असलेला मॉरेस कॉलेज टी पॉइंटचा परिसर अक्षरश: भगवामय झाला होता. नोटबंदीमुळे बाहेरून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा आल्याचे बोलले जात होते.

नागपुरात निघालेला हा राज्यातील ४६ वा मोर्चा होता. विदर्भासह नागपुरात यापूर्वीही मराठा तसेच मराठा-कुणबी मोर्चे निघाले असल्याने त्याचाही संभाव्य गर्दीवर विपरित परिणाम जाणवल्याची चर्चा सुरू होती. विदर्भात कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. ओबीसींमध्ये समावेश असल्याने कुणबी समाजाला आरक्षण लागू आहे. या जातीय समीकरणाचा फटका मोर्चाला बसला, असा सूरही आयोजकांपैकी काहींनी बोलून दाखविला.

शिवसेनेचे मंत्री, आमदार भगवेे फेटे बांंधून मोर्चात सहभागी....
सत्ताधारी सरकारमधील भाजप-शिवसेनेचे मंत्री आणि नेतेही सहभागी झााले आहेत. शिवसेनेचे सर्व मंत्री–आमदार डोक्याला भगवे फेटे बांधून मोर्चात सहभागी झाले आहेत. यापूर्वी त्यांनी विधानभवनच्या पायऱ्यांवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणा केली.

या आहेत मराठा मोर्चाच्या प्रमुख मागण्या...
मराठा समाजाला आरक्षण द्या, अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, त्याचप्रमाणे अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, अशा या मोर्चाच्या प्रमुख मागण्या आहेत.
मोर्चेकऱ्यांना गाड्या शहराबाहेर पार्क कराव्या लागल्याने त्यांना 4-4 किलोमीटरची पायपीट करावी लागली. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्ताशिवाय वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष तुकडी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिस सहआयुक्त संतोष रस्तोगी यांनी दिली होती.
सत्ताधारी-विरोधकांमध्ये मोर्चात सहभागी होण्यासाठी श्रेयाची लढाई...
सत्ताधारी पक्षांसोबत विरोधकांमध्ये मोर्चात सहभाग घेतला. यावरून त्यांत श्रेयासाठी लढाई सुरु असल्याचे चित्र दिसून आले. या लढाईत कालपर्यंत भाजपने बाजी मारल्याचे आवर्जुन दिसून आले. पण शिवसेनाही काही मागेे नव्हती. शिवसेनेने ताकदीने मोर्चात सहभाग नोंदवला.

भगवे फेटे, सदरे, फलक घेऊन सेनेचे आमदार मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दिल्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) एकनाथ शिदे हे सेनेच्या मोर्चाच्या अग्रस्थानी दिसले. भाजपकडून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह आशिष शेलार, काटोलचे आमदार आशिष देशमुख बहुसंख्येने आमदारांनी मोर्चात सहभाग घेतला.
पुढील स्लाइडवर पाहा... नागपुरात निघालेल्या विराट मोर्चाचे PHOTO आणि VIDEO काय आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या?

खालील बातम्‍यांमध्‍ये पाहा, विराट मोर्चाचे PHOTO आणि VIDEO
हिंगोलीत नजर जाईल तिकडे मराठा, नजर जाईल तिथे भगवा, पाहा photos

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...