आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आयआयएमसी’ मध्ये मराठीत पत्रकारिता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पत्रकारितेत हाेणारे नवनवीन बदल प्रामुख्याने इंग्रजी भाषेतील पत्रकारिता अभ्यासक्रमातच शिकायला मिळतात. परंतु आता अमरावतीतील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन्स (आयआयएमसी) या केंद्रीय पातळीवरील संस्थेत पुढील वर्षी हे नवीन अभ्यासक्रम मराठीत शिकण्याची साेय हाेणार अाहे.

आयआयटी, आयआयएमच्या धर्तीवर देशात पत्रकारांच्या प्रशिक्षणासाठी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन्स या संस्थेची स्थापना करण्यात अाली अाहे. अाजवर या संस्थेत हिंदी व इंग्रजी भाषेत शिक्षण दिले जात हाेते. अाता पुढील वर्षीपासून प्रादेशिक भाषेतही ही संधी मराठी विद्यार्थ्यांना मिळणार अाहे अशी माहिती आयआयएमसीचे महासंचालक के. जी. सुरेश यांनी दिली. ‘गेल्या ५० वर्षांपासून आमची संस्था पत्रकार घडविण्याचे काम करीत आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाच्या अखत्यारितील ही संस्था स्वायत्त अाहे. दिल्लीव्यतिरिक्त महाराष्ट्रातील अमरावती, केरळ, जम्मू,ओरिसा आणि ऐजवाल येथे तिच्या शाखा आहेत. या शाखांमध्ये इंग्रजी आणि हिंदीत प्रशिक्षण दिले जाते. गेल्या काही वर्षांपासून प्रशिक्षणाची व्याप्ती वाढवण्याचा विचार सुरु होता. यासाठी आम्ही प्रादेशिक भाषांमध्ये प्रशिक्षण देण्याची योजना तयार करीत होतो. त्यानुसार अाता मराठीत संपूर्ण अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून पुढील वर्षापासून अमरावतीत मराठीत पत्रकारिता प्रशिक्षण सुरु केले जाईल,’ असे सुरेश म्हणाले.

नवी मुंबईत अॅनिमेशन, गेमिंग व व्हिज्युअल ग्राफिक्सचे प्रशिक्षण देण्यासाठी सेंटर फाॅर एक्सलन्स सुरु करण्यात येणार आहे. हा २०० कोटींचा प्रकल्प असून ‘पीपीपी’ तत्वावर ‘फिक्की’सोबत आम्ही सुरू करीत असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...