आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा व वाङ्मय मंडळ कॉलेजात स्थापन करणे अनिवार्य, मराठी साहित्य महामंडळाचा पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांनी “मराठी भाषा व वाङ्मय मंडळ’ स्थापन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तसे आदेश पारित केले अाहेत. महाविद्यालयांनी “मराठी भाषा व वाङ्मय मंडळ’ स्थापन करून तसा अहवाल विभाग तसेच महामंडळाला सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे. अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने यासाठी पुढाकार घेतला होता. यामध्ये सोलापूर विद्यापीठाने बाजी मारली आहे. विद्यापीठाने “मराठी भाषा व वाङ्मय मंडळ’ स्थापन करून तसा अहवालही महामंडळाला सादर केला आहे.  
 
विनोद तावडे यांना पत्र
महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहून मराठी भाषा हा विषय पदवीपर्यंत सर्व विद्याशाखांच्या अभ्यासक्रमात स्वतंत्र म्हणून कायम सुरू करण्यात यावा यासह “मराठी भाषा व वाङ्मय मंडळ’ स्थापन करण्यात यावे या मागण्या केल्या होत्या. त्यातील मंडळाची मागणी मान्य करण्यात आली. मात्र, मराठी भाषा विषयाच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याची खंत जोशी यांनी व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...