आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या विदर्भकन्‍येने केले ब्रिक्स संमेलनात भारताचे नेतृत्‍व, 27 व्‍या वर्षी झाली होती खासदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावना गवळी - Divya Marathi
भावना गवळी
नागपूर - राजस्‍थानातील जयपूर येथे ब्रिक्स देशांच्‍या महिला खासदारांच्‍या संमेलन झाले. यामध्‍ये भारताच्‍या महिला खासदारांचे नेतृत्‍व करण्‍याचा मान यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्‍या खासदार भावना गवळी यांना मिळाला. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे त्‍यांच्‍या खास माहिती....
कशा आल्‍या राजकारणात
> भावना गवळी यांनी रिसोड (जि. वाशीम) येथील बाबासाहेब धाबेकर कला आणि वाणिज्‍य महाविद्यालयातून बीएची पदवी घेतली.
> वाशीमच्‍या राजस्‍थान महाविद्यालयातून त्‍यांनी एमए केले.
> त्‍यांचे वडील पुंडलिकराव हे शिवसेनेचे अकोला जिल्‍हा प्रमुख होते.
> त्‍यांच्‍याकडूनच त्‍यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले.
> कॉलेजला असताना त्‍या विद्यार्थी संसदेच्‍या अध्‍यक्ष म्‍हणून निवडून आल्‍या.
> आता देशाच्‍या संसेदत वाशीम - यवतमाळ लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्‍व करत आहेत.
महाराष्‍ट्रातील महिला खासदार
1. रजनी पाटील (कॉंग्रेस)
2. सुप्रिया सुळे (राष्‍ट्रवादी कॉंग्रेस)
3. भावना गवळी (शिवसेना)
4. पूनम महाजन (भाजप)
5. डॉ.प्रीतम खाडे-मुंडे (भाजप)
6. रक्षा खडसे (भाजप)
7. डॉ. हीना गावित (भाजप)
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, अवघ्‍या 27 व्‍या वर्षी झाल्‍या होत्‍या खासदार... संपले दिग्‍गजांचे राजकारण.... वडलांनी केला होता सुधाकर नाईकांचा पराभव...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...