आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन स्‍थगित, राज्‍यमंत्री पाटील यांची मध्‍यस्‍थी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंदोलक शिक्षकांना सरबत पाजताना डॉ. पाटील. - Divya Marathi
आंदोलक शिक्षकांना सरबत पाजताना डॉ. पाटील.
अमरावती - विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे, या प्रमुख मागणीकरिता मागील 15 दिवसांपासून संपूर्ण राज्‍यात विना अनुदानित कृती समितीच्या वतीने बेमुदत उपोषण आंदोलन सुरू होते. गृहराज्‍यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मध्‍यस्‍थी केल्‍यानंतर गुरुवारी हे आंदोलन तूर्त स्‍थगित करण्‍यात आले.
राज्य सरकारच्या वतीने डॉ. पाटील यांनी केली मध्‍यस्‍थी
> राज्य सरकारच्या वतीने राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यशस्वी मध्यस्थी करून आंदोलनकर्त्‍यांच्या मागण्याचा विचार करणार असे आश्वासन दिले.
> पाटील यांच्‍या आश्वासनानंतर लिंबू सरबत घेऊन आंदोलनकर्त्‍यांनी उपोषण स्थगित करीत असल्याची घोषणा केली.

पाटील यांनी नेमके काय आश्वासन दिले
1) अनुदानित निर्णय झालेल्या शाळांना 20 टक्के अनुदान देणार
2) अमरावती विभागातील 57 अघोषित शाळांना अनुदानित घोषित करण्यासाठी प्रयत्न करणार
3) भाजप सरकार शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडविणार
> 20 टक्‍के अनुदानासाठी पात्रशाळा -1628
> लाभधारक शिक्षक - 19 हजार 247
> अनुदान पात्र तुकड्या - 2,452
> सरकारी तिजोरीवर बोजा - 163.21 कोटी रुपये
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)