आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्लील क्लिप व्‍हायरल करण्याची धमकी देऊन विद्यार्थ्‍यिनीचेे शारीरिक शोषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांनीवर बलात्कार करून तिची अश्लील क्लिप काढण्यात आली व ही क्लिप पसरविण्याची धमकी देऊन पीडितेवर बलात्कार करून चाकू हल्ला केल्याची घटना चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड गावात घडली. पीडित मुलीवर सध्या पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्‍पिटलमध्‍ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणात चांदूर रेल्वे पोलिसांनी युवतीच्या तक्रारीवरून आरोपीवर बलात्कार, बाल लौंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला व त्‍यांना ताब्‍यात घेतले आहे.
- मार्डी गावातील विद्यार्थिनी दोन महिन्यापूर्वी तिच्या मामाकडे शिकण्यासाठी मांजरखेड येथे आली होती.
- गावातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तिची आरोपीशी ओळख झाली.
- 14 जुलैला पीडित मुलगी शाळेतून परत येत असताना अभय नामक विद्यार्थ्याने तिला घरी नेले.
- चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तिची अश्लील क्लिप आरोपीने काढली.
- घटनेची वाच्यता केल्यास मारण्याची धमकीही आरोपीने दिली होती.
- पीडितेच्या अश्लील क्लिप वरून तिचे तीन वेळा शारीरिक शोषणही केले.
बातम्या आणखी आहेत...