आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘घेऊन जा ऽऽ गे मारबत... म्‍हणत नागपूरकरांनी काढले शोभा डे आणि मल्‍ल्‍यांचे वाभाडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - तब्बल 135 वर्षांपासून अव्याहतपणे चालू असणारा मारबत उत्‍सव आज (शुक्रवार) शहरात धूमधडक्‍यात साजरा झाला. या उत्‍सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्‍या विरोधात राग आणि संताप व्यक्त होत होता. दरम्‍यान, विजय माल्ल्या आणि लेखिका शोभा डे यांचे काढलेले वाभाडे हेच यंदाच्‍या मातबताचे खास वैशिष्‍ट्य ठरले.

यांच्‍या प्रतिमा ठरल्‍या आकर्षण

यंदाच्या बडग्यांवर राजकीय घटनांची छाप लक्षवेधी ठरली. बडग्या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समिती, लालगंज खैरीपुरा येथील युवाशक्ती बडग्या उत्सव समिती यांच्‍या प्रतिमा लक्षवेधी ठरल्‍या.
काय आहे मारतब ?
'मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणूक प्रकार फक्त नागपूरातच आहे. पूर्वी, बांकाबाई हिने इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्याचा निषेध म्हणून बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरून केलेल्या पुतळ्याची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस) मिरवणूक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते.
काळी आणि पिवळी मारबत
यामध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत. बाकांबाईच्या नवर्‍यानेपण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणून त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणूक काढतात. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला 'बडग्या' म्हणतात. या दिवशी(श्रावण अमावस्येच्या दुसऱ्यादिवशी) नागपूर व जवळपासच्या गाव - खेड्यातील लोकं नागपूरला आपल्या लहानग्यांना घेऊन येतात. मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात. ही एक प्रकारे जत्राच आहे. यंदा काळ्या मारबतीच्या मिरवणुकीला 135 वर्षे तर पिवळ्या मारबतीला 132 वर्षे पूर्ण झाली आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, मारतबचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...