आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबांच्या आशिर्वादाने झाले लग्न, अमरावतीची सून झाली ही अभिनेत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दाक्षिणात्य अभिनेत्री नवनीत कौर यांनी पंजाबी आणि साउथ इंडियन चित्रपटांमध्‍ये काम केलेले आहे. अमरावती लोकसभा मतदार संघातून त्‍यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्‍यांच्‍या विषयी ही खास माहिती...
आमदार रवी राणा यांच्यासोबत सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार रवी राणा यांच्यासोबत नवनीत कौर यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले होते. 2 फेब्रुवारी 2011 रोजी झालेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यात 3162 जोडप्यांनी लग्न केले होते. त्यात 2443 हिंदू, 739 बौद्ध, 150 मुस्लिम, 15 ख्रिश्चन आणि 13 अंध जोडप्यांचाही समावेश होता. मदार रवी राणा यांच्या लग्नामुळे या सोहळ्यात अनेक दिग्गज आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यात तत्‍कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योग गुरू रामदेव बाबा, सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांच्यासह बॉलिवूडमधील विवेक ओबेरॉय देखील सहभागी झाले होते.
वाद आणि नवनीत एक पक्के समीकरण
पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या नवनीत कौर -राणा यांनी मार्च 2014 मध्‍ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर अमरावतील लोकसभा निवडणूक लढवली होती. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव होता. त्यावेळी विरोधी उमेदवारांनी त्यांच्यावर खोटे जात प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने मुंबई पोलिसांना या प्रकरणी एफआयआर दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते.
याशिवाय काही दिवसांपूर्वी नवनीत यांनी त्यांच्या फोटोशी छेडछाड करुन फेसबुक आणि व्हॉट्स्अपवर पोस्ट केल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार केली होती. त्यांनी हे विरोधकांचे कृत्य असल्याचे म्हटले होते.
रामदेव बाबांच्या आश्रमात झाली रवी राणांची भेट
नवनीत कौर यांना योगाची आवड आहे. त्या योग गुरु रामदेव बाबा यांच्या शिष्य आहेत. त्याचे पती रवी राणा हे देखील रामदेव बाबांना मानतात. रामदेव बाबा यांच्या एका शिबीरातच रवी राणा आणि नवनीत यांची भेट झाली होती. त्यानंतर दोघांनी रामदेव बाबांच्या परवानगीनेच नाते संबंध वाढविले. 2011 मध्ये लग्न झाल्यानंतर नवनीत यांनी चित्रपटांना रामराम केला आणि पतीसोबत राजकीय मार्ग निवडला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, नवनीत कौर यांची खासगी आणि राजकीय आयुष्यातील काही महत्त्वाची निवडक छायाचित्र....
बातम्या आणखी आहेत...