आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भासाठी एल्गार : यवतमाळात बसेसची तोडफोड, भाजपच्या जाहीरनाम्याची होळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ बसस्‍थानकात बसवर दगडफेक करण्‍यात आली. - Divya Marathi
यवतमाळ बसस्‍थानकात बसवर दगडफेक करण्‍यात आली.
नागपूर/अमरावती/वर्धा/यवतमाळ/औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५७ वा वर्धापनादिन उत्साहात साजरा होत असताना विदर्भवाद्यांनी अनेक ठिकाणी काळे झेंडे फडकावले. या शिवाय विदर्भात २४ ठिकाणी स्वतंत्र विदर्भ राज्याचे ध्वज फडकावण्यात आले. अमरावती, वर्धेत भाजपच्या जाहिरानाम्याची होळी करण्यात आली. दरम्यान, यवतमाळमध्ये आंदोलकांनी पाच एसटी बसवर दगडफेक केल्याचे वृत्त असून, पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे नागपूरमध्ये रास्तारोको करण्यात आला तर जालन्यामध्येही मराठवाडा राज्याचा झेंडा फडकावण्यात आला.

मे या महाराष्ट्रदिनी अखंड महाराष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपराजधानीत नागरिकांना पेढे वाटून आणि गुलाबाचे फूल देऊन महाराष्ट्र दिन साजरा केला, तर विदर्भवाद्यांनी विदर्भाचा झेंडा फडकवून तसेच विदर्भाची शपथ घेऊन काळा दिवस साजरा केला. कस्तुरचंद पार्क येथील पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शासकीय कार्यक्रमात विदर्भवाद्यांनी काळे फुगे सोडून अनोखा निषेध केला.

बजाजनगर येथील विष्णूजीकी रसोई येथे सकाळी ८.३० वाजता अॅड. श्रीहरी अणे यांच्या उपस्थितीत वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकवण्यात आला. या वेळी अॅड. मुकेश समर्थ, सुलेखा कुंभारे, विनोद देशमुख, अविनाश पाठक, अहमद कादर आदींसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी सर्व उपस्थितांनी वेगळ्या विदर्भाची शपथ घेऊन विदर्भ राज्य घेण्याचा निर्धार केला.

ध्वजवंदनानंतर माध्यमांशी बोलताना श्रीहरी अणे यांनी मे रोजी िवदर्भ महाराष्ट्रात सामील झाला म्हणून हा शोक दिवस साजरा करत असल्याचे सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अणेंवर अश्लाघ्य भाषेत टीका केली. त्याविषयी विचारले असता, पातळी सोडून बोलणे विदर्भाच्या रक्तात नाही. हा रक्तदोष आमच्यात नाही. वैदर्भीय जनता आणि नेते सुसंस्कृत आहे, असा टोला त्यांनी हाणला. शिवसेना आणि ‘मनसे’त भीती निर्माण झाली आहे म्हणून ते रास्ता रोको करत आहे, असे ते म्हणाले.

भाजपच्या जाहीरनाम्याचे दहन
विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे भाजपच्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील जाहीरनाम्याचे दहन गांधी पुतळा, व्हेरायटी चौक येथे दुपारी १२.३० वाजता करण्यात आले. या वेळी समितीचे राम नेवले, अॅड. वामनराव चटप, अॅड. नंदा पराते, प्रबीरकुमार चक्रवर्ती, अरुण केदार, धनंजय धार्मिक आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. जाहीरनामा जाळल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून डिटेन केले. दुपारी सर्व कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले.

‘बीआरएसपी’ची पदयात्रा
बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे संविधान चौकातून सायंकाळी वाजता िवदर्भ पदयात्रा काढण्यात आली. याशिवाय शहीद चौकात धरणे देण्यात आले.

‘मनसे’तर्फे आतषबाजी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त नागपूर शहरात रात्री ११.३० वाजता लक्ष्मी भुवन चौक, धरमपेठ येथे आतषबाजी करण्यात आली. या शिवाय ‘मनसे’चे शहरप्रमुख प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात विदर्भवाद्यांसमोर सकाळी ८.३० वाजता बजाजनगर येथील मनसे कार्यालयात अखंड महाराष्ट्राचा ध्वज फडकवण्यात आला.

‘बीआरएसपी’ची पदयात्रा : बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीतर्फे संविधान चौकातून सायंकाळी वाजता िवदर्भ पदयात्रा काढण्यात आली. याशिवाय शहीद चौकात धरणे देण्यात आले.

अणेंचा प्रतीकात्मक पुतळा जाळला : अॅड. श्रीहरी अणे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून शिवसेनेने िवदर्भवाद्यांचा निषेध केला. शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांच्या नेतृत्वात भंडारा रोडवर झालेल्या कार्यक्रमात विदर्भविरोधी घोषणा देण्यात आल्या.

मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या वतीने जालन्यात महाराष्ट्र दिनाला विरोध करण्यात आला. मराठवाडा राज्य व्हावे, या मागणीसाठी जालन्यात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी मराठवाडा राज्याचा झेंडा फडकवला.
पुढील स्‍लाइडवर वाचा, 1 जानेवारीपासून अणेंचे भाजपविरोधी आंदोलन...
बातम्या आणखी आहेत...