आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्र‍िकेच्‍या खेळाडूंनी नागपूरमध्‍ये चालवला ऑटो, केली orange city ची सैर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेल स्टेन याने ऑटो रिक्षा पकडून नागपूरची गल्‍लीबोळात सैर केली. एवढेच नाही तर ऑटोवर बसून घेतलेले फोटो त्‍याने आपल्‍या  इन्स्टाग्राम अकाउंट शेअर केले. - Divya Marathi
डेल स्टेन याने ऑटो रिक्षा पकडून नागपूरची गल्‍लीबोळात सैर केली. एवढेच नाही तर ऑटोवर बसून घेतलेले फोटो त्‍याने आपल्‍या इन्स्टाग्राम अकाउंट शेअर केले.
नागपूर - येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या आंतरराष्‍ट्रीय मैदानावर भारत दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात 25 नोव्हेंबरपासून तिसरी कसोटी रंगणार आहे. तत्पूर्वी सामन्याची रणनीती ठरवण्याच्या दृष्टीने उभय संघांनी दोन दिवस आधी सोमवारी मैदानावर कसून सराव केला. विशेषत: दोन्ही संघांनी त्यांच्या महत्त्वाच्या खेळाडूंच्या सरावावर भर दिला. सरावानंतर काही खेळाडू रेस्टोरेंटमध्‍ये गेले तर काहींनी मॉलण्‍ध्‍ये जावून शॉपिंग केली. दरम्‍यान, आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेन याने ऑटो रिक्षा पकडून नागपूरची गल्‍लीबोळात सैर केली. एवढेच नाही तर ऑटोवर बसून घेतलेले फोटो त्‍याने आपल्‍या इन्स्टाग्राम अकाउंट शेअर केले. शिवाय स्‍वत: ऑटो चालवला. पण, त्‍याला ओळखताच चाहत्‍यांनी स्‍वाक्षरीसाठी त्‍याच्‍या मागे धाव घेतली. त्‍यामुळे त्‍याने हॉटेल गाठले.
पुढील स्लाइड्सवर पाहा गर्दीतून हॉटेलकडे जाताना डेल स्टेन...