आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ध मॅरेथॉन शर्यतीसाठी सोईस्कर मार्ग निश्चित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात प्रथमच होणाऱ्या अर्ध मॅरेथॉन शर्यतीसाठी मार्ग निश्चित झाला आहे. राज्यभरातून येणाऱ्या धावकांसाठी सोयीस्कर तसेच धावण्यास उत्तम असा मार्ग आयोजकांनी निवडला आहे. मुख्य २१ िक.मी. अंतराच्या शर्यतीची सुरुवात जिल्हा स्टेडियम वरून तर शेवटही जिल्हा स्टेडियम वरच होणार आहे. विशेष बाब अशी की, ही शर्यत अर्धे शहरच आवाक्यात घेणार आहे. अर्थात जिल्हा स्टेडियमच्या ट्रॅकला वळसा घालून धावक बाहेर निघून पंचवटी चौकातून वेल्कम पाॅईंटकडे निघतील. तेथून बियाणी चौकात येतील, बियाणी चौकातून गर्ल्स हायस्कूल चौक, इर्विन चौक, तेथून पुलावरून वळसा देऊन राज कमल चौक, तेथून पुन्हा इर्विन चौक परत पंचवटी चौक, वेल्कम पाॅईंट आणि आधीच्याच मार्गाने स्टेडियम च्या आत प्रवेश करून ट्रॅकला पूर्ण फेरा मारून धावक अंतिम रेषा गाठणार आहेत. अशाप्रकारे हे २१ कि.मी.अंतर पूर्ण हाेईल, अशी माहिती आयोजन प्रमुख जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव प्रा. अतुल पाटील यांनी दिली.
खेळाडूंसाठी अगदी उत्तम सोय करण्यात आली आहे. सकाळी वाजता शर्यत सुरू होणार असून अगदी स्टेडियमपासून ते अंतिम रेषेपर्यंत त्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, ग्लुकोज, ज्युस दिले जाणार आहे. त्यानंतर शर्यत पूर्ण झाल्यावर सर्व सहभागी खेळाडूंना उत्तम नाश्ता दिला जाणार आहे. याशिवाय जलपानाची सोय वेगळी आहे.

राहण्याची उत्तम व्यवस्था : २१कि.मी. शर्यतीत राज्यातील दिग्गज धावक सहभागी होणार असल्यामुळे त्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था आयोजकांतर्फे हाॅटेलमध्ये करण्यात आली आहे. प्रथमच आयोजित अर्ध मॅरेथॉन शर्यतीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये. तसेच राज्यभरात या निमित्ताने चांगला संदेश जायला हवा, असा आयोजकांचा प्रयत्न आहे.

आयोजकांतर्फे टी शर्ट
एका स्पोर्टस कंपनीद्वारे निर्मित टी शर्ट आयोजकांतर्फे धावकांना दिले जाणार आहे. एकाच रंगातील हे टी शर्ट असल्यामुळे खेळाडूंची ओळख पटवणे दूरून ही सहज शक्य होणार आहे. टी शर्टमुळे आयोजकाचे नाव राज्यभर पोहोचणार आहे.
बातम्या आणखी आहेत...