आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: तूर खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी आर्णीत आंदोलन, अचानक केले शासकीय तूर खरेदी बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्णी- तुरीला चांगला भाव मिळवा यासाठी शेतकऱ्यांनी आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नविन यार्डात जवळपास हजार क्विंटल तुर विक्रीसाठी आणली आहे. मात्र दि, १५ फेब्रुवारी पासून भारतीय खाद्य निगमने अचानकपणे शासकीय तुर खरेदी बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरल्याने दि,२ मार्च रोजी दुपारी वाजता दरम्यान येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नविन यार्डात असलेल्या मोबाईल टॉवर वर चढून आंदोलन करण्याचा शेतकरी कार्यकर्त्यांनी पवित्रा घेतल्याने प्रशासनाची चांगलीच झोप उडाल्याने एकच धावपळ सुरू झाली.

शिवसेनेचे पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते प्रविण मुनगिनवार,भाजपचे युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष विजयसिंग राठोड,मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष सचिन यलगंधेवार,शौकत तंवर मनोज भुजाडे आणि अर्धनग्न अवस्थेत शेतकरी विजय ढाले यांनी मोबाईल टॉवर वर चढून त्वरीत शासकीय तूर खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी लक्षवेधी आंदोलन केले. काही वेळात हजारो शेतकरी त्या ठिकाणी जमा झाले. 

बाजार समितीचे संचालक राजेंद्र बुटले यांच्या नेतृत्वात अतुल मुगिनवार,शेख अशफाक,निलेश बुटले,सुरेश कथळे,आकाश वाघमारे सुशील वानखडे यांनी बाजार समितीच्या समोर यवतमाळ मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने दोन्ही बाजुला वाहनांचे लांबलचक रांगा लागल्या.वाहतूक सेवा कोलमडल्याने ठाणेदार संजय खंदाडे नायब तहसीलदार मांडेकर आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन आंदोलनकर्त्यांची अर्धा तासा नंतर समजूत काढण्यात यश आले.त्या नंतर नायब तहसीलदार यांनी भारतीय खाद्य निगमच्या अधिकारी सोबत भ्रमणध्वनी वरून शासकीय तुर खरेदी सुरू करण्या बाबत चर्चा केली.या दरम्यान भारतीय खाद्य निगमचे एरिया मॅनेजर आदित्य किशोर लाल यांनी लवकरात लवकर तुर खरेदी सुरू करण्याचे आश्वासन तहसिल पोलीस प्रशासनाला दिले. 

लेखी आश्वासनानंतर घेण्यात आले आंदोलन मागे 
गेल्या पंधरा दिवसा पासून आर्णी येथे शासकीय तुर खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरू आहे.शेतकऱ्यांना त्वरित न्याय मिळावा यासाठी सहा कार्यकर्त्यांनी टॉवर वर चढून लक्षवेधी आंदोलन सुरू केले.पाच तास चाललेल्या लक्षवेधी आंदोलन अखेर लेखी आश्वासनाने मागे घेण्यात आले.यावेळी प्रविण मुनगिनवार,विजयसिंग राठोड,सचिन यलगंधेवार,शौकत तंवर,विजय ढाले यांनी सोमवार पासून शासकीय तुर खरेदी सुरू केल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा बाजार समिती प्रशासनाला दिला. 

बाजार समितीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची घेतली भेट 
आर्णीत शासकीय तुर खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी दुपारी एक वाजताच्या सुमारास टॉवर वर चढून आंदोलन सुरू झाल्याने परिस्थिती हाता बाहेर जाऊ नये यासाठी बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील शिष्ट मंडळांनी पालकमंत्री मदन येरावार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आर्णी येथील शासकीय तुर खरेदी सुरू करण्याची मागणी केली.या दरम्यान पालकमंत्री येरावार यांनी जिल्हाधिकारी,एरिया मॅनेजर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सोबत चर्चा करून सोमवारपासून तुर खरेदी पोलिस बंदोबस्तात सुरू करण्याचे आदेश दिले. 
 
१० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त 
अचानक खरेदी बंद केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यामुळे शासकीय तुर खरेदी सुरू असतांना कुठलाही वाद होऊ नये यासाठी १० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात तुर खरेदी सुरू करणार असल्याची ग्वाही बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. त्यामुळे शेतकरी शांत झाले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...