आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या पाच आरोपींना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस ठाण्यात जमलेली मृतक विवाहितेच्या माहेरची मंडळी नागरिक. - Divya Marathi
पोलिस ठाण्यात जमलेली मृतक विवाहितेच्या माहेरची मंडळी नागरिक.
दर्यापूर :  शहरातील साईनगर येथील रहिवाशी असलेल्या रायपूरे कुटूंबातील सुनेने घरी कुणी नसताना छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सासरच्या जाचाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा माहेरच्या मंडळींनी केला आहे. या प्रकरणी सासच्या पाच मंडळींना अटक करण्यात आली असून यामध्ये पती, सासु-सासरे, दिर, मावस सासू यांचा समावेश आहे. दिपाली आशिष रायपूरे (२७) असे मृतक विवाहितेचे नाव आहे. 
 
जोपर्यंत आरोपींना अटक करणार नाही, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका मुलीच्या माहेरच्यांनपी घेतल्याने गुरुवारी (दि. १५) पोलिसांनी अखेर पती आशिष रामेश्वर रायपुरे (३३), सासरे रामेश्वर बापूराव रायपुरे (६३), सासू अल्का रामेश्वर रायपुरे (५४), दीर स्वप्निल रामेश्वर रायपुरे (२६) मावस सासू रेखा रेखे (५७) सर्व रा. साईनगर, दर्यापूर यांना सायंकाळी उशिरा अटक केली. घटनेची माहिती मिळताच रात्री उपविभागिय पोलीस अधिकारी सचिन हिरे, ठाणेदार मुकूंद ठाकरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सासरच्या मंडळींना ताब्यात घेतल्यानंतर गुरुवारी रात्री उशीरा मृतक विवाहतेच्या मुळ गावी पैलपाळा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसस्कांर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
 
अकोला जिल्ह्यातील पैलपाळा येथील दीपाली हिचा रीतिरिवाजाप्रमाणे मागील वर्षी एप्रिल महिन्यात आशिषसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांनी पतीसह सासरच्या मंडळींनी मानसिक शाररिक त्रास या ना त्या कारणांसह पैशांची मागणी करीत जीवे मारण्याची धमकी देत होते. त्यामुळे मृतक दीपाली सतत तणावाखाली रहात होती. त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींना केला. या प्रकरणी मृतक विवाहितेचे काका प्रमोद भालतिलक यांनी सासरच्या मंडळींविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान माहेरच्या मंडळींनी बुधवारी रात्रीच साईनगर गाठले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार मुकुंद ठाकरे करित आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...