आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपुरच्या तरुण महिलेची ग्वाल्हेरमध्ये आत्महत्या, चिमुकल्याला दाराला बांधले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)- मुळची नागपुरची असलेल्या एका 22 वर्षीय महिलेने गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली. यावेळी 8 महिन्यांच्या चिमुकल्याला दाराला बांधून ठेवले होते. सुरवातीला पोलिसांनी फोनवर विचारले तेव्हा पतीने सांगितले, की मी शहराबाहेर आहे. पण नंतर तो घराच्या गच्चीवरच सापडला. त्याच्या गुन्हेगारी स्वभावामुळे तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
पतीने फोन करुन पोलिसांना बोलवले होते
- सोनिया राय असे या महिलेचे तर कमल राय असे पतीचे नाव आहे.
- गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास घासमंडी येथील राय कॉलनीत राहत्या घरी सोनिया आत्महत्या करत आहे, असा फोन कमल याने पोलिस कंट्रोल रुमला केला होता.
- मी शहराबाहेर आहे. लगेच जाऊन माझ्या बायकोला वाचवा, असे तो फोनवर म्हणाला होता.
- त्यानंतर पोलिसांचे पथक लगेच सोनियाच्या घरी गेले. पण तोपर्यंत तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
- पोलिसांनी तिचा मृतदेह खाली उतरवला. पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
- या दरम्यान पोलिसांनी घराची तपासणी केली. तेव्हा कमल घराच्या गच्चीवरच लपून बसलेला दिसला.
- आत्महत्या करतानाही सोनियाला चिमुकल्याची काळजी होती. ती मेल्यावर तो घराबाहेर जाऊ नये म्हणून त्याला दाराला दोरीच्या मदतीने बांधून ठेवले होते.
दोन वर्षांपूर्वी झाले होते लग्न
- सोनिया मुळची नागपुरची आहे. दोन वर्षांपूर्वी तिचे कमलसोबत लग्न झाले होते. त्याच्या गुन्हेगारी स्वभावामुळे सोनिया प्रचंड त्रस्त होती.
- यावरुन दोघांमध्ये कायम भांडण व्हायचे. घटनेच्या दिवशीही तिचे नवऱ्यासोबत भांडण झाले असावे असा पोलिसांना संशय आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...