आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताईला म्‍हणाला होता, गावात आल्‍यावर तुला भेटेल, आता आले पार्थिव, पाहा 30 फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व छायाचित्र- मनीष जगताप, अमरावती
नांदगाव खंडेश्वर, अमरावती- अमरावती जिल्ह्यातील नांदगांव खंडेश्वर येथील विरपुत्र पंजाब उर्फ विक्की जानराव उईके हे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाल्याची वार्ता सोमवारी सकाळी गावात धडकताच गावकऱ्यांचे पाऊले उइके यांच्या घराकडे वळली. गावातील सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, कार्यालये बंद झाले. शाळा महाविद्यालयाला सुटी देण्यात आली. अंतिम दर्शनासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी पंजाब उइके यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. गावातील युवा सैनिक देशरक्षणाकरीता शहीद झाला होता. आज त्‍यांच्‍या पार्थिवावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येणार आहेत. या संग्रहात आम्‍ही काही फोटोमधून आपल्‍याला य शहीदाचे गाव दाखवत आहोत.
बहिणीला भेटण्याची इच्छा राहिली अपूर्ण: केवळ 10 दिवसांपूर्वी 26 वा वाढदिवस साजरा केलेल्या शहीद पंजाब उर्फ विकी जानराव उईके यांचे काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांशी झालेले बोलणे अखेरचे ठरले. काश्मीरमधील उरी सेक्टरमधील लष्कराच्या छावणीवर रविवारी झालेल्या दहशवादी हल्ल्यामध्ये पंजाब उईके शहीद झाले. नांदगांव खंडेश्वर येथील ओंकारखेडा परिसरातील मुळ रहिवासी असलेले पंजाब २००९-१० मध्ये झालेल्या भरतीतील रेजिमेंट बिहार बटालीयनचे शिपाई होते. आईवडील, विवाहित बहीण भाऊ असा परिवार असलेल्या कुटुंबीयांची ख्यालीखुशाली जाणून घेतल्यानंतर त्यांनी बहिणीच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. गावाकडे आल्यानंतर बहिणीची अवश्य भेट घेऊ असे ते बोलले होते. मात्र दहशवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विकास यांची बहिणीची भेट घेण्याची इच्छा अपूर्ण राहिली. या वेळी वडिलांनी त्यांच्याकडे काही पैशांची मागणी केली असता, त्यांनी दहा हजार रुपये पाठवून दिवाळीत घरी येतो, असे कुटुंबीयांना सांगितले होते, परंतु नियतीला काही औरच मान्य असल्याने त्यांची घरच्यांशी भेट होण्यापूर्वीच त्यांना वीर मरण आले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, शहीद पंजाब यांचे गाव नांदगाव खंडेश्‍वर..
पुढे पाहा, व्‍हिडियो..
बातम्या आणखी आहेत...