अमरावती - अमरावती शहरातील विविध राष्ट्रीयकृत बँकांकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन त्या रकमेची परतफेड केल्यामुळे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार गजानन कुलकर्णीचा नागपुरात मंगळवारी (दि. १४) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती कारागृह सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. गजानन वसंतराव कुलकर्णी (४३, रा. पटवीपुरा) यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शहरातील काही राष्ट्रीयकृत बँकांकडून २०१२ मध्ये कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले आहे.
हे कर्ज घेतेवेळी एकच मालमत्ता वेगवेगळ्या बँकांना देणे, कर्जाची परतफेड करणे असे प्रकार घडले. त्यामुळे संबंधित बँकांनी पोलिसात तक्रार दिली आहे. गजानन कुलकर्णीविरुद्ध शहरातील शहर कोतवाली पोलिस ठाण्यात कोटी हजार तसेच ४० लाख रुपये कर्ज फसवणूक प्रकरणात गुन्हे दाखल आहे तसेच गाडगेनगर पोलिस ठाण्यात कोटी ८१ लाख १५ लाख रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर गजानन कुलकर्णी पसार होते. त्यांना जवळपास एक ते दीड महिन्यांपूर्वी कोतवाली पोलिसांच्या पथकाने मुंबईतून अटक करून आणले हाेते. त्यानंतर कुलकर्णीची रवानगी कारागृहात झाली.
दरम्यान, कारागृहात असतानाच कुलकर्णींना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, त्यांची प्रकृती अधिक खालावली होती. त्यामुळे कारागृह प्रशासनानेच त्यांना मागील काही दिवसांपासून नागपूरच्या रुग्णालयात दाखल केले होते. नागपुरात उपचार सुरू असतानाच त्यांचा मंगळवार १४ जून रोजी मृत्यू झाल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. कुलकर्णीला ‘जॉइंडीस’ आजार झाला होता. त्यामुळेच कुलकर्णींचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने कारागृह प्रशासनाला दिली आहे.
उपचारा दरम्यान मृत्यू
गजानन कुलकर्णीवर मागील काही दिवसांपासून नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचाराला दाद देता त्यांचा मृत्यू झाला आहे. आम्हाला रुग्णालय प्रशासनाकडून माहिती प्राप्त झाली आहे. नाईक, कारागृहअधीक्षक, अमरावती.
कोटी ४० लाखांच्या प्रकरणांचे तपास सुरू
गजानन कुलकर्णीविरुद्ध गुन्हा दाखल असलेल्या चारही प्रकरणात जवळपास कोटी ४० लाख रुपयांची वेगवेगळ्या बँकांची फसवणूक झाली आहे. या चार प्रकरणांपैकी एक गुन्हा कोटी ८१ लाख कर्जाच्या रकमेचा आहे. या प्रकरणासंह दोन प्रकरणांचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सुरू आहे.