आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा स्वाभिमानचे ‘म्याऊ’ आंदोलन, गाडगेनगर पोलिसांनी केली ३० कार्यकर्त्यांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराविरुद्ध युवा स्वाभिमान पक्षातर्फे उपेन बछेल यांच्या नेतृत्वात म्याऊ आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांच्या मार्गदर्शनातील या आंदोलनात सहभागी युवा स्वाभिमानच्या ३० कार्यकर्त्यांना गाडगेनगर पोलिसांनी अटक केली. साेबतच कार्यकर्त्यांनी पिंजऱ्यात बंद करून आणलेले मांजरही ताब्यात घेतले.

जिल्हा परिषदेत दरवर्षी १५० कोटी रुपयांचे घोटाळे होतात. घोटाळे करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी सामान्यांच्या हक्क्याच्या या पैशाचा गैरवापर करून स्वत:साठी सोन्याची लंका उभारली. मेळघाटात आदिवासींच्या विकासाकरिता त्यांच्या सोयींसाठी पीएच अंतर्गत जो निधी येतो त्याचा वापर पेव्हिंग ब्लाॅक बसवण्यासाठी करण्यात आला. तसेच एका-एका पीएचसीवर ३० ते ३५ लाखाचा निधी टाकण्यात आला. या कामांची जर -निविदा करण्यात आली तर आपल्याला कमिशन भेटणार नाही म्हणून मेळघाटातील सुमारे १० ते २० कोटी रुपयांची कामे विविध बनावट शिर्षांअंतर्गत दाखवण्यात आली. केवळ दाखवण्यासाठी सुबेअच्या नावावर ५० ते १०० कामांचे वाटप करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणावर जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकारी अभियंता यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप युवा स्वाभिमानने दिलेल्या पत्रकाद्वारे केला आहे.

२५ ते ५० हजार रुपयात दरमहा पगार कमावणाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची माया जमवून बंगले उभे केले. सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी व्हायला हवी. तसेच ती जास्त िनघाल्यास सरकारकडे जमा करण्यात यावी. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचा िनषेध करण्यासाठी म्याऊ आंदोलन करून खुर्च्या निलाम करण्यात त्यात गैर काय? असा प्रश्नही युवा स्वाभिमानने उपस्थित केला आहे.

सामान्यांची अडवणूक
मागीलअनेकवर्षांपासून जिल्हा परिषदेत मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. प्रत्येक योजनेसाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागतात. कमिशन घेतल्याशिवाय येथे काम होत नाही. सामान्यांचे शोषण कदापि सहन केले जाणार नाही. त्यामुळेच हे आंदोलन केले. उपेन बछेल,संपर्क प्रमुखयुवा स्वाभिमान.