आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेनमध्येच प्रसुतीवेदना, एमबीबीएस स्टूडेंटने \'व्हॉट्सअॅप\'द्वारे केली महिलेची डिलिव्हरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- तुम्ही 'थ्री इडियट्स' सिनेमा पाहिला असेलच. त्यातील रॅन्चो (अमिर खान) याने ऑनलाइन इंस्ट्रक्शन घेऊन प्रोफेसर वीरू सहस्त्रबुद्धे यांच्या थोरल्या मुलीची सुखरुप डिलिव्हरी केल्याचा सीनही तुम्ही पाहिला असेल. अगदी तशीच घटना अहमदाबाद- पुरी एक्स्प्रेसमध्ये घडली आहे. एका एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने धावत्या ट्रेनमध्ये व्हॉट्‍सअॅपवरून सीनियर्सच मदत घेत त्याने महिलेची सुखरुप डिलिव्हरी केली आहे.

रायपूर येथील रहिवासी चित्रलेखा ही 24 वर्षीय गरोदर महिला या एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून प्रवास करत होती. एक्स्प्रेसने वर्धा स्टेशन सोडल्यानंतर चित्रलेखा हिला अचानक प्रसूती वेदना सुरु झाल्या होत्या. याच ट्रेनमधून विपिन खडसे हा मेडिकलचा स्डूडेंट प्रवास करत होता. तो तिच्या मदतीला धावून आला. विशेष म्हणजे त्याने या कामात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून वरिष्ठ डॉक्टर्सची मदत घेतली.

गरोदर महिला रायपूरची...
- रेल्वेचे पीआरओ पी.डी. पाटील यांनी सांगितले की, ही घटना गेल्या शुक्रवारची आहे. अहमदाबाद-पुरी एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून रायपूर येथील रहिवासी चित्रलेखा प्रवास करत होती. प्रवासादरम्यान तिला अचानक प्रसुतीवेदना सुरु झाल्या. त्यावेळी ट्रेन नागपूरपासून 30 किलोमीटर अंतरावर होती.
- ट्रेनमध्ये नागपूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजचा एमबीबीएसचा विद्यार्थी विपीन खडसे हा प्रवास करत होता. तो महिलेच्या मदतीसाठी धावून आला.

डब्यातील एका कंपार्टमेंटमध्ये तयार केली साड्यांची लेबर रूम
- विपिनने सांगितल्यानुसार, डब्यातील महिलांनी साड्यांच्या मदतीने कंपार्टमेंटमध्ये लेबर रूम तयार केली.
- विपिनने हॉस्पिटलच्या सीनियर रेजिडेंट डॉ. शिखा मलिक यांची मदत घेतली.
- डॉ.शिखा यांनी व्हॉट्सअॅपवर विपिन याला अनेक इंस्ट्रक्शन दिल्या. त्या त्याने फॉलो करत चित्रलेखाची सुखरुप डिलिव्हरी केली.
- नागपूरच्या रेल्वे अधिकार्‍यांना याबाबत आधीच सूचित करण्‍यात आले होते. प्लॅटफॉर्मवर मेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आली होती. स्टेशनवर ट्रेन पोहोचताच चित्रलेखा आणि तिच्या बाळाची तपासणी करण्यात आली.

सोशल मीडियावर व्हायरल झाली विपिनची स्टोरी
विपिन खडसे याने काही फोटोज फेसबुकवर शेअ‍र केले आहेत. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'चित्रलेखाची डिलिव्हरी करण्यासाठी मी गेलो तेव्हा तिला खूप ब्लीडिंग होत होते. तिला असाह्य वेदना होत हत्या. महिलांच्या मदतीने कंपार्टमेंट रिकामे करून साड्या-चादरींच्या मदतीने लेबर रुम तयार करण्‍यात आली. डिलिव्हरी फारच गुंतागुंतीची होती. मी डॉक्टर्सच्या ग्रुप व्हॉट्सअॅपवर फोटो शेअर केला. सीनियर रेजिडेंट डॉ. शिखा मलिक यांनी मला मदत केली. त्यांनी फोनवर सांगितलेल्या सर्व इंस्ट्रक्शन मी फॉलो केल्या.

महिलेचे ब्लीडिंग थांबवण्यासाठी मला गार पाण्याच्या बाटल्यांचा वापर करावा लागला. यासाठी एका वयोवृद्ध महिलेचेही मार्गदर्शन घेतले. विपिनची ही स्टोरी फेसबुकवर व्हायरल झाली आहे. 6 हजारांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... विपिनने फेसबुकवर शेअर केलेले फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...