आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या टाकीत 3 वर्षीय बालकाचा मृतदेह, घरमालकावर गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेहकर (जि.बुलडाणा)- पाण्याच्या टाकीत चार वर्षीय बालकाचा मृतदेह सापडल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी मेहकरमध्ये उघडकीस अाली. मात्र शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच अापल्या मुलाची हत्या केल्याचा अाराेप मृत बालकाच्या पालकांनी केला अाहे. त्यावरुन संबंधित घरमालकाविराेधात गुन्हा दाखल झाला अाहे.

शहरातील वाॅर्ड क्रमांक मधील रहिवासी जमील शहा यांचा चार वर्षांचा मुलगा मुस्तफिलशहा हा खेळत असताना शेजारीच राहणाऱ्या हरीश उदासी (वय ४५) यांनी त्यास साेबत उचलून नेले स्वत:च्या घरातील पाण्याच्या टाक्यामध्ये ढकलून दिले. यामुळेच बालकाचा बुडून मृत्यू झाला, अशी तक्रार मृत बालकाच्या अाईवडिलांनी पाेलिसात दिली अाहे. या तक्रारीवरून पोलिसांनी हरीश उदासीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती शहरात पसरताच काही काही नागरिकांनी आठवडी बाजारात असलेल्या हरीश उदासी यांच्या हॉटेल दूध डेअरीची तोडफोड केली, त्यामुळे इतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. त्यामुळे तणावाचे वातावरण हाेते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, संबंधित फोटो..