आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटच्या पुनर्वसित गावकऱ्यांची ‘डरकाळी’, प्रकल्प संचालकांच्या कार्यालयात धडकले शेकडो ग्रामस्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मेळघाटव्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या १४ गावांचे वनविभागाच्या व्याघ्र प्रकल्पाकडून पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र,गावकऱ्यांना अजूनही प्राथमिक सुविधांसह काहींना रक्कम मिळाली नसल्याचा आरोप करून १४ गावांमधील शेकडो नागरिक सोमवारी (दि.२७)आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक कार्यालयात धडकले. मोर्चेकऱ्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी उभारलेले कठडे तोडून गावकऱ्यांनी आमदार कडू यांनी तब्बल तास चर्चा करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मागण्यांची पुर्तता तातडीने करण्याचे ठोस आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले.या वेळी प्रकल्प कार्यालय परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील केलपाणी, सोमठाणा खु., सोमठाणा बु., बारुखेडा, अमोना, धारगड, गुल्लरघाट, अंबाबरवा, चुणखडी, गोलाई, कंजोली, मोथाखेडा, राणीगाव या गावांचे पुनर्वसन झाले आहे. मात्र पुनर्वसन झाल्यानंतरही गावकऱ्यांना शासनकडून मिळणारा निधी पूर्ण मिळाला नाही, प्राथमिक सुविधा नाही, मिळणाऱ्या निधीमधून काही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या सर्व प्रकरणातून पुनर्वसीत आदिवासी गावकऱ्यांची सुटका करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आताच्या आता करण्यासाठीच आमदार बच्चू कडू गावकऱ्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. दिनेशकुमार त्यागी यांच्या कार्यालयावर मोर्चा आणला होता. दुपारी वाजता शेकडो गावकरी, आमदार बच्चू कडू प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते कार्यालयाबाहेर जमले. मोर्चा दुपारी वाजताचा होता मात्र पोलिसांनी आमदार कडू यांच्या आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता इतका धसका घेतला होता की, सकाळी ११ वाजतापासूनच गर्ल्स हायस्कूलकडून जिल्हाकचेरी कार्यालयाकडे जाणारा मुख्य मार्ग एका दिशेने बंद केला, तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयात तगडा बंदोबस्त पुरवला होता. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आमदार कडू २५ गावकरी चर्चेसाठी डॉ. त्यागी यांच्या दालनात पोहोचले.
बातम्या आणखी आहेत...