नागपूर - 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस दसऱ्याचा होता. तेव्हापासून दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा केला जातो. दरवर्षी देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी नागपूर मध्ये दाखल होतात. 1956 मध्ये दस-याच्या दुस-या दिवशी बाबासाहेबांनी लाखो बौध्द उपासकांसमोर अत्यंत उद्बोधक भाषण केले होते. त्या ऐतिहासिक भाषणातील काही मुद्दे divyamarathi.com या पॅकेजमध्ये मांडत आहे.
समाजाच्या साक्षरतेचे महत्त्व, महिला सन्मान, मासाहार विरोधातील चळवळ, मांध्यमांनी केलेली टीका, नागपूरमध्येच सभा घेण्याचे कारण असे विविध विषय त्यांनी भाषणात मांडले होते. यावेळी झालेल्या भाषणात बाबासाहेबांनी एक प्रसंग सांगितला, 'एकदा मी संगमनेरला सभेला गेलो होतो. सभा झाल्यानंतर मजकडे एक चिठ्ठी केसरीच्या त्या बातमीदाराने पाठविली व मला विचारले, "अहो, तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेली ढोरे ओढू नका म्हणुन सांगता. त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाही, त्यांना अन्न नाही, त्यांना शेतीवाडी नाही, अशी त्यांची बिकट परिस्थिती असता, दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्यांचे, शिंगाचे, मांसाचे 500 रुपयांचे उत्पन्न फेकून द्या म्हणून सांगता, यात तुमच्या लोकांचा तोटाच नाही काय?
पुढील स्लाइड्सवर वाचा, डॉ. आंबेडकर यांचे उत्तर व ऐतिहासिक भाषणातील काही मुद्दे ..