आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहा मायक्रोफायनान्स कंपन्यांची चौकशी सुरू, पोलिस घेणार आरबीआयचे मागदर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जवळपास दहा मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेणाऱ्या कर्जदारांपैकी सुमारे दीडशे ते पावणे दोनशे कर्जदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. दरम्यान, या सर्व तक्रारींची चौकशी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्याच ‘स्मॉल सेव्हींग्ज’कडे (अल्प बचत विभाग) सोपवली असून, सोमवारपर्यंत ही चौकशी पूर्ण होणार आहे. त्यानंतरचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून भारतीय रिजर्व बँकेकडे पाठवण्यात येणार आहे.
मागील पाच ते सहा वर्षांमध्ये या कंपन्यांची ‘सावकारी’ प्रचंड वाढली. कर्जासंदर्भात ग्राहकांना कोणतेच नितीनियमांची माहिती नसल्यामुळे या कंपन्यांकडून कर्जदारांचे प्रचंड शोषण होत असल्याची बाब जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना माहिती होताच त्यांनी संबंधितांना तक्रार करण्याचे जाहीर आवाहन केल्यानंतर कर्जदारांच्या तक्रारींचा ढीग लावला आहे. याच तक्रारींमधून मायक्रोफायनान्सचे खरे ‘वास्तव’पुढे आले आहे. दरम्यान, शुक्रवारपासून (दि.२५) जिल्हाधिकारी कार्यालय संबधित महसूल कार्यालयांमध्ये मायक्रोफायनान्स कंपन्यांविरुद्ध तक्रारांची गर्दी झाली . आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात किमान दीडशे ते दोनशे कर्जदारांनी दहा वेगवेगळ्या मायक्राेफायनान्स कंपन्यांविरुद्ध तक्रार केल्या आहेत. या तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी गित्ते यांनी सदर तक्रारींची चौकशी जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीतील अल्पबचत विभागाकडे दिली असून सोमवारपर्यंत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या अल्पबचत विभाग या प्रकरणांची चौकशी करत आहे. अल्पबचत विभागाकडून अहवाल प्राप्त होताच सोमवारी (दि. ६) हा अहवाल आरबीआयकडे पाठवून या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली जाणार आहे.

सावकारी कर्जाला वेसन घातल्यानंतर खऱ्या अर्थाने मायक्रोफायनान्स कंपन्यांचे जाळे विस्तारत गेले आहे. कर्ज मागणाऱ्या व्यक्तीची कर्ज परत करण्याच्या क्षमता आहे का? याबाबत पडताळणी करता अवघ्या आधार कार्ड किंवा कोणत्याही ओळखपत्राच्या आधारे हजारो रुपयांचे कर्ज या मायक्रोफायनान्स कंपन्यांनी दिल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या तक्रारदार महिला पुरुष
विविध मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतलेल्या काही महिलांनी आठ दिवसांपूर्वी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या.त्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे. या प्रकरणात गुन्हा होतो किंवा नाही, यासाठी पोलिसांनी हे प्रकरण विधी अधिकाऱ्यांकडे पाठवले आहे. त्यांच्याकडून अभिप्राय प्राप्त होताच पोलिस आरबीआयकडूनही मागदर्शन घेणार आहे. कारण मायक्रोफायनान्स कंपन्या आरबीआयची परवानगी आहे तसेच आम्ही आरबीआयच्याच नियमानुसार काम करत असल्याचा दावा या कंपन्यांवर देखरेख ठेवणाऱ्या एमफीनच्या अधिकाऱ्यांनी केला आहे,असे आर्थिक गुन्हे शाखेचे पीआय गणेश अणे यांनी सांगितले.

चौकशी पूर्ण होताच पाठवणार पत्र
^आतापर्यंत आमच्याकडे दीडशे ते पावणे दोनशे तक्रारी आल्या असून, यामध्ये दहा मायक्रोफायनान्स कंपन्यांचा समावेश आहे. याची चौकशी सुरू असून सोमवारपर्यंत चौकशी पूर्ण होणार आहे किरण गित्ते, जिल्हाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...