आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एमआयएम’ची विधिमंडळावर धडक, मुस्लिम-मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मराठा व मुस्लिम समाजाला राज्यात तत्काळ आरक्षण लागू करावे, संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करण्यात यावी तसेच वक्फ बोर्ड कमिटी स्थापन करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी ‘एमअायएम’ पक्षातर्फे मंगळवारी विधानभवनावर माेर्चा काढण्यात अाला. छावा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह काही कार्यकर्तेही या अांदाेलनात सहभागी झाले होते.

पक्षाध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी या अांदाेलनासाठी येणार असल्याचे सांगितले जात हाेते, मात्र ते अाले नाहीत. अाैरंगाबादचे अामदार आमदार इम्तियाज जलील व अामदार वारिस पठाण यांनी माेर्चाचे नेतृत्व केले. प्रदेशाध्यक्ष मोईन सय्यद यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. महाल चिटणीस पार्क येथून निघालेला मोर्चा मोहिनी काॅम्प्लेक्स येथे अडवण्यात आला.

महाराष्ट्रात जवळपास १५ टक्के लोकसंख्या असणारा मुस्लिम समाज उपेक्षेचे जीवन जगत आहे. न्या. राजेंद्र सच्चर कमिटी व महाराष्ट्रात मेहमूद रहमान कमिटी स्थापन करण्यात आली. या दोन्ही समित्यांनी महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासासाठी १५ टक्के आरक्षण देण्यात यावे, विकासात्मक योजना राबवण्यात याव्या यासह अन्य शिफारशी केल्या आहे. मात्र, अद्यापही शासनाने यासंदर्भात पावले उचललेली नाहीत. मुस्लिम समाजाप्रमाणे मराठा समाजाचीही अवस्था दयनीय आहे. त्यामुळे या दोन्ही समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी या वेळी आमदार जलील व पठाण यांनी केली.

नितीशकुमार यांनी बिहारमध्ये दारूबंदी केली. मग, महाराष्ट्रात दारूबंदी का केली जात नाही, अनेक गावांत पाणी मिळत नाही, दारू मात्र मिळते, हे सरकारचे अपयश आहे. समाजात शांतता आणि सौहार्द निर्माण करण्यासाठी राज्यभर दारूबंदी करावी, अशी मागणी ‘एमआयएम’च्या वतीने करण्यात आली.

एमआयएमशी संबंध नाही : छावा
सोलापूर - अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन ही एक सामाजिक चळवळ अाहे. अण्णासाहेब जावळे पाटील हे या संघटनेचे संस्थापक अाहे. मराठ्यांना अारक्षण िमळावे ही अामची सुरुवातीपासूनची मागणी अाहेच, पण त्यासाठी सोमवारी ‘एमअायएम’बरोबरच्या नागपूरमध्ये झालेल्या अांदाेलनात अाम्ही सहभागी नव्हताे. तर छावाने स्वतंत्रपणे जागरण, गाेंधळ अांदाेलन केले, अशी माहिती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रताप कांचन यांनी िदली.
बातम्या आणखी आहेत...