आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएमच्या आजच्या आरक्षण मोर्चात छावाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मराठा व मुस्लिम समाजाला तत्काळ आरक्षण लागू करावे, संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करावी, वक्फ बोर्ड कमिटी स्थापन करावी या मागण्यांसाठी एमआयएम पक्षातर्फे सोमवारी विधानभवनावर मोर्चा जाणार आहे. पक्षाध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यात सहभागी होणार असून, आमदार इम्तियाज जलील व वारिस पठाण नेतृत्व करतील. या मोर्चात छावा संघटनाही सोबत असल्याचा दावा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष मोईन सय्यद यांनी केला.
राज्यात १५ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. तसेच मराठा समाजाचीही अवस्था दयनीय असल्याचे सय्यद यांनी म्हटले.
दोन्ही समाजांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण द्यावे. शिवाय समाजात शांतता व सौहार्द राखण्यासाठी राज्यात दारूबंदी करावी, असे सय्यद म्हणाले.
मराठा समाजाला साथ
काँग्रेस व भाजपने मराठा, मुस्लिमांचा मतांसाठी वापर करून घेतला. अाता आरक्षणासाठी एमआयएम लोकलढा उभारत असून यात मराठा समाजालाही सोबत घेणार असल्याचे सय्यद म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...