आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना मिळणार सातबारावरच युरिया !, केंद्रीय राज्यमंत्री अहिर यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - देशात युरियाचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी शेतकऱ्यांना अाता केवळ सातबाराच्या उताऱ्यावर हे खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या विचाराधीन अाहे, अशी माहिती केंद्रीय खते, रसायने राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली.
अहिर म्हणाले की, ‘शेतातील खतांच्या व्यतिरिक्त उद्याेगांमध्येही युरियाचा माेठ्या प्रमाणावर वापर करण्यात येताे. त्यामुळे काळाबाजार वाढला अाहे. ताे राेखण्यासाठी अाता युरियाची खरेदी-विक्री करण्याकरिता काही अटी-शर्ती लागू करण्याचा विचार सरकार करीत आहे. यात सातबाराच्या उताऱ्यावर शेतकऱ्यांना युरिया देणे, युरियावरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे इत्यादी बाबींचा समावेश असेल.’
बंद पडलेले सहा कारखाने करणार सुरू : देशातील उत्पादन वाढविण्याकरिता मागील सरकारच्या काळात बंद पडलेले युरियाचे सहा कारखाने पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे अहिर यांनी सांगितले. तेलंगणा, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार या राज्यांत असलेले आठ कारखाने बंद पडले आहेत. यापैकी सहा कारखाने सुरू करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. यामुळे देशात युरियाचे उत्पादन वाढेल. कोळशावर आधारित युरियाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे अहिर यांनी सांगितले.

युरियाची वस्तुस्थिती
-२२० लाख टन प्रतिवर्ष देशातील उत्पादन
- ९० लाख टन प्रतिवर्ष अायात
- २२ ते २५ हजार रुपये प्रतिटन खर्च गॅसवर आधारित युरिया निर्मितीसाठी
- १२ ते १५ हजार रुपये प्रतिटन खर्च कोळशावर आधारित युरिया निर्मितीसाठी
- ५ ते ६ हजार रुपये प्रतिटन- शेतकऱ्यांना युरियाचा दर
- १७ ते २० हजार रुपये प्रतिटन- केंद्र सरकार देते अनुदान
बातम्या आणखी आहेत...