आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चात 150 हून अधिक आमदार, मंत्रीही सहभागी होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर : हिवाळी अधिवेशनावर बुधवारी मराठा मोर्चा धडकणार असून या मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या मोर्चाचे वैशिष्ट्ये म्हणजे यात सर्व पक्षांचे मिळून १५० हून अधिक आमदार सहभागी होणार असून सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीमधील मंत्रीही मराठा समाजासोबत रस्त्यावर उतरणार आहेत. राज्याच्या इतिहासात असा प्रसंग पहिल्यांदाच घडणार आहे.

सर्वपक्षीय मिळून विधानसभेत २८८ तसेच विधान परिषदेत ७८ आमदार आहेत. दोन्ही सभागृहांतील आमदारांची संख्या ३६६ असून यापैकी मराठा व कुणबी आमदारांची संख्या १६९ च्या घरात जाते. यात भाजपचे ४३ आमदार असून शिवसेना ४४, काँग्रेस २९ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४३ आमदारांचा समावेश आहे.
सर्व पक्षांतील मराठा आमदारांनी मोर्चात सहभागी होण्याचा आपला निर्धार असल्याचे स्पष्ट केले असून यामुळे आपापल्या मतदारसंघातील मराठा समाजाची सहानभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
विदर्भ तसेच कोकणात कुणबी आमदारांची संख्या बऱ्यापैकी असून मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी आपण मोर्चात उतरणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कुणबी समाजातील काही जातींचा ओबीसी आरक्षणात समावेश झाला असला तरी मोठ्या संख्येने कुणबी समाज आरक्षणाच्या परिघाबाहेर असल्याने आपण मराठ्यांच्या सोबत असल्याचे या लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.
याआधी संयुक्त महाराष्ट्र लढ्यावेळी सर्वपक्षीय आमदारांचे धरणे आंदोलन झाले होते. त्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मराठी बांधवांच्या मागे उभे राहण्यासाठी सर्व पक्षांच्या आमदारांनी एल्गार केला होता.

सत्ताधारी पक्षांसोबत विरोधकांमध्ये मोर्चात सहभागी होण्यासाठी श्रेयाची लढाई असल्याची चित्र दिसत आहे. या लढाईत कालपर्यंत भाजपने बाजी मारल्याचे दिसत होते. पण आता शिवसेनेनेही ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेचे सर्व आमदार उद्या भगवे फेटे परिधान करून मोर्चात उतरणार आहेत. याआधीही आम्ही मराठा मोर्चात सहभागी झालो होतो आणि नागपुरातही शिवसेनेचे बहुतेक सर्व आमदार मोर्चात उतरतील.
भगवे फेटे, सदरे, फलक घेऊन सेनेचे आमदार मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) एकनाथ शिंदे हे सेनेच्या मोर्चाच्या अग्रस्थानी असतील.
भाजपकडून शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह आशिष शेलार, काटोलचे अामदार आशिष देशमुख व बहुसंख्येने आमदारांचा सहभाग असणार आहे.
बातम्या आणखी आहेत...