आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसूड यात्रा: कोणाचा हात पाहून मुख्यमंत्री कर्जमाफीची योग्य वेळ ठरवणार; आमदार बच्चू कडूंचा सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संस्थेतर्फे आयोजित “देवेंद्र ते नरेंद्र’ शेतकरी आसूड यात्रेला मंगळवार, ११ एप्रिलला महात्मा फुले जयंतीदिनी नागपुरातील आमदार निवास येथून प्रारंभ झाला. आमदार निवास परिसरात झालेल्या छोटेखानी सभेत बोलताना आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर आसूड ओढला. सत्ता आली तर व्यापारी आणि नसली की शेतकरी, असे सगळ्याच सरकारचे धोरण अाहे. फडणवीस सरकारही याला अपवाद नाही. विरोधात असताना कर्जमाफी मागणारे आता योग्य वेळेची भाषा बोलत आहेत. या सरकारची योग्य वेळ कधी येणार आहे?  मुख्यमंत्री कोणाचा हात पाहून योग्य वेळ ठरवणार आहेत? असा संतप्त सवाल कडू यांनी केला.  

काँग्रेस-राष्ट्रवादीने शेतकऱ्यांसाठी संघर्ष यात्रा काढली. आघाडी सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या असत्या तर त्यांच्यावर संघर्ष यात्रा काढण्याची वेळ आली नसती, अशी टीकाही त्यांनी केली. नागपुरातून प्रारंभ झालेली ही आसूड यात्रा २१ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर या गावी पोहोचणार आहे. तेथे रक्तदानाने सांगता होणार असल्याचे कडू यांनी सांगितले.   

सरकारी नोकरदारांना भरमसाट पगार आहे. सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. त्यासाठी तरतूद करणाऱ्या सरकारजवळ फक्त शेतकऱ्यांसाठीच पैसा नाही काय? असा सवाल कडूंनी केला. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील हे देखील यात सहभागी झाले आहेत.

अशा आहेत मागण्या
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा द्या, शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी, पेरणी ते कापणीपर्यंतची कामे मनरेगातून करण्यात यावीत, ऊसतोड कामगारांना हार्वेस्टर यंत्राप्रमाणे प्रतिटन ४०० रुपये मजुरी देण्यात यावी, शेतकरी, शेतमजूर, विधवा, गोरगरीब सैनिकांची रेशनची सबसिडी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी, पंतप्रधान आवास योजनेतील शहरी आणि ग्रामीण दरी दूर करून सरसकट रुपये साडेतीन लाखांचे अनुदान द्या.


पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा...पहिल्याच तारखेला पगार; मग शेतकऱ्यांसाठी पैसे का नाहीत? रघुनाथदादा पाटील यांचा सवाल... 'देवेंद्र ते नरेंद्र’ शेतकरी आसूड यात्रेचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...