आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेच्या तक्रारींची ‘जत्रा',अामदार बच्चू कडू यांनी सर्किट हाऊसमध्ये जाणून घेतल्या जनतेच्या समस्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जनसामान्यांच्या तक्रारींचा निपटारा संबंधित प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यकक्षेतच ठरवून दिलेल्या कालावधीतच व्हावा, असा शासकीय नियम आहे. परंतु, त्या तक्रारी त्वरित सोडवल्या जात नसल्याने काहींना त्या सोडवण्यासाठी पंचायत समितीपासून ते मंत्रालयापर्यंत पायपीट करावी लागते. दरम्यान, प्रशासन कितीही गतिमान झाल्याचा दावा करत असले तरीही सोमवारी (दि. १८) आमदार बच्चू कडू यांनी घेतलेल्या जनता दरबारात तक्रारी सोडवण्यासाठी जनसामान्यांची ‘जत्रा' भरली होती. सर्किट हाऊसमध्ये आयोजित दरबारात तब्बल २७० तक्रारींचा खच आमदार कडू यांच्यासमक्ष आला होता. यापैकी १०२ तक्रारी तत्काळ निकाली निघाल्याचा दावा प्रहारने केला आहे.उर्वरित तक्रारींचाही लवकरच निपटारा होणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंबईतील एका कर्मचाऱ्याची अडचण असल्यामुळे त्याने आमदार बच्चू कडू यांना समस्या सांगितली. ही समस्या सोडवण्यासाठी आमदार कडू मंत्रालयातील एका उपसचिवाकडे गेले होते. त्या वेळी जाब विचारण्यासाठी गेलेल्या आमदार कडू उपसचिवाचा वाद झाला. या वादानंतर आमदार कडू यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करून त्या उपसचिवाने पोलिसात तक्रार केली होती. तक्रारीवरून आमदार कडूंविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता, त्यांना अटकही झाली होती. हे प्रकरण २० दिवसांपूर्वी घडले आहे. त्याच वेळी आमदार कडू यांनी महाराष्ट्रभर आपण जनता दरबार घेऊन सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळेच सोमवारी (दि. १८) पहिला जनता दरबार त्यांनी घेतला आहे. या वेळी अमरावती जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातूनही नागरिकांनी जनता दरबारात तक्रारी मांडल्या होत्या.
आमदार कडू यांनी घेतलेल्या जनता दरबारात सोमवारी सकाळपासूनच तक्रारदार नागरिकांची गर्दी झाली होती. दुपारी १२ वाजतापासून सुरू झालेला हा दरबार रात्री वाजेपर्यंत सुरू होता. या वेळी तक्रारदार ज्या आशेने जनता दरबारात तक्रार घेऊन येत होता, त्याच प्रकारे त्याला दरबारात सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. दिवसभरात आलेल्या २७० तक्रारींपैकी १०२ तक्रारींचा तत्काळ निपटारा झाला असून, ४० तक्रारी या मंत्रालयस्तरावरील असल्यामुळे त्या मुंबईत घेऊन जाण्यात येणार आहे. तर, उर्वरित तक्रारी ज्या विभागासोबत संबंधित असेल त्या अधिकाऱ्यांसोबत २० एप्रिलला सर्किट हाऊसलाच बैठक घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी १२ वाजतापासून सुरू झालेल्या तक्रारींचा ओघ रात्री वाजता थांबला होता. या वेळी प्रहारचे शहराध्यक्ष धीरज जयस्वाल, जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू, जोगेंद्र मोहोड यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

नगर परिषदमधून सेवानिवृत्त कर्मचारी एस. के. सव्वालाखे कडू नामक व्यक्ती २०१२ मध्येच सेवेतून निवृत्त झाले आहे. मात्र, त्यांना अजूनही रजा रोखीकरणाचे लाखो रुपये मिळाले नाहीत. याउलट आमच्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ही रक्कम देण्यात आली आहे, अशी तक्रार या कर्मचाऱ्यांनी केली होती. या वेळी संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे प्रकरणाबाबत विचारणा करून उद्याच आपण नगर परिषदेला जाणार असल्याचे आमदार कडू यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील एका महाविद्यालयातील ४४ कर्मचाऱ्यांना चार वर्षांपासून सहाव्या वेतन आयोगाची रक्कम मिळाली नाही. ही रक्कम कोटी लाख रुपये होती. सदर रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यासाठी संबंधित एका अधिकाऱ्याने लाख रुपये लाच मागितली होती. मात्र, कर्मचाऱ्यांनी ही लाच दिली नाही म्हणून ही रक्कम शासनाकडे परत गेली आहे. या वेळी आमदारांनी या प्रकरणात दखल घेऊन मंत्रालयस्तरावर विषय मांडणार असल्याचे सांगितले. तसेच नोकरी अनुकंपासंदर्भात महिलांनी सुद्धा या वेळी तक्रारी केल्या आहे. मोहन साबळे यांनी सहकार विभागाच्या कार्यालयात माहिती अधिकाराद्वारे जिल्ह्यातील सावकारांनी किती शेतकऱ्यांना कर्ज दिले होते, किती शेतकऱ्यांचे माफ झाले अन्य काही माहिती विचारली होती. मात्र, दोन महिन्यांनंतरही ही माहिती मिळाली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यासोबत बोलून तातडीने माहिती द्या, असे आमदार कडू यांनी सांगितले होते. तसेच हरिकिशोर डोळस या अपंग युवकाला अद्याप घरकुल मिळाले नाही, याव्यतिरिक्त अनेक व्यक्तींनी प्रशासनाच्या इतर यंत्रणेविरोधात तक्रारी दिलेल्या आहेत.

चार शेतकऱ्यांच्या विहिरींबाबत झाला निपटारा : अमरावतीतालुक्यातील कठोरा गांधी येथील बलदेव वानखडे, विठ्ठल वानखडे, नाना वानखडे आणि लीलाबाई वानखडे या शेतकऱ्यांपैकी दोन शेतकऱ्यांना नवीन विहिरी शासनाकडून मंजूर झाल्या आहे, तर दोन शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरींच्या अनुदानाचा प्रश्न आहे. यासंदर्भात आमदारांनी तत्काळ यंत्रणेसोबत संपर्क केला. दरम्यान, आगामी दोन ते तीन दिवसात हे प्रकरण निकाली निघणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे या शेतकऱ्यांनी 'दिव्य मराठी'सोबत बोलताना सांगितले.

वेळ आली तर प्रतिमंत्रालय चालवू
^आम्ही जनता दरबार घेण्याचे ठरवले होते. त्यामुळेच सोमवारी पहिला जनता दरबार अमरावतीत घेतला. आता दुसरा जनता दरबार मुंबईत २१ एप्रिलला होईल. मुंबईतील दरबारात राज्यातून जवळपास दोन हजार तक्रारी येण्याचा अंदाज आहे. आमच्यासोबत पुणे मुंबईतील काही व्यक्ती जुळले आहे. त्यामुळे भविष्यात आम्ही प्रतिमंत्रालय चालवू शकतो. बच्चू कडू, आमदार अचलपूर.

जनता दरबारात गजानन हरिभाऊ म्हस्के नावाचे माजी सैनिक आले, त्यांनी तक्रार दिली. १९८९ मध्ये त्यांच्यासह इतर चार माजी सैनिक पाच भूमिहीन व्यक्तींनी शासनाकडे जमिनीची मागणी केली होती. तत्कालीन तहसीलदारांनी जमीन देण्याबाबत आदेश दिले. मात्र, २०१६ उजाडले तरीही जमीन मिळाली नाही. जमीन मागणाऱ्या पाच माजी सैनिकांपैकी तिघांचा तर तीन भूमिहीन व्यक्तींचे असे सहा जणांचे मृत्यू झाले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आपण जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...