आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यविधीसाठी लाकडे नसल्याने अंत्ययात्रा पोहोचली वनविभागात, आमदारांनी लावला वनमंत्र्यांना फोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडचिरोली - जिल्ह्यातील चार्मोशी येथे सरणासाठी जळाऊ लाकूड मिळत नसल्यामुळे संतप्त जमावाने अंत्ययात्रा थेट वनविभागाच्या कार्यालयात आणली. या घटनेने कार्यलयात एकच खळबळ उडाली. सहा महिन्यांपासून जळाऊ लाकडांचा तुटवडा असल्याने नागरिक त्रस्त आहेत.   
25 हजार लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी  गावात अनेक महिन्यांपासून जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अंत्यविधी करण्यात अनेक अडचणी येत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती. अखेर आज लोकांच्या संयमाचा बांध फुटला. 
 
आमदारांनी अंत्ययात्रा आणली वनविभागात
चामोर्शी येथील हनुमाननगरमध्ये राहणा-या एका गरीब महिलेचे निधन झाले. अंत्यविधीसाठी जळाऊ लाकूड उपलब्ध नव्हते. हे कळाल्यानंतर  गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी हे चामोर्शी येथे आले. गेल्या ६ महिने सामान्य जनता जळाऊ लाकडे उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहेत, मात्र वनविभाग कुंभकर्णाची झोप घेत असल्याची टीका लोकांनी केली. 
आमदार होळी यांना सोबत घेऊन लोक थेट वनविभागाच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी अंत्ययात्राही त्यांच्या सोबत होती. या अनोख्या निषेध आंदोलनात स्वतः आमदार सहभागी झाले यामुळे जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक आणि इतर अधिका-यांनी वनविभागात धाव घेतली. इकडे आमदार डॉ. होळी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून वनविभागाच्या सुस्त कारभाराची माहिती त्यांना दिली. अखेर वनमंत्री मुनगंटीवार यांनी मध्यस्थी केल्यावर आंदोलक शांत झाले. 
बातम्या आणखी आहेत...