आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदाराने केले महिलांशी केले अयोग्य वर्तन, महिलांवरच केला शिवीगाळ केल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- भाजप आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या विरोधात रामटेक पोलिस ठाण्यात महिलांशी असभ्य वर्तन केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. रेड्डी यांच्यावर वाहनचालकाला सांगून महिलांना गाडीने धडक दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आमदारांचे स्वीय सहाय्यक रजत गजभिये यांनी महिलांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात येऊन शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
 
निवेदन देण्यासाठी गेल्या होत्या महिला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रहार संघटनेच्या प्रमुख संगिता वांढरे या आमदार यांच्या कार्यालयात मायक्रोफायनॅस कंपन्यांकडून होणाऱ्या त्रासाबाबत निवेदन देण्यास गेल्या होत्या. त्यावेळी आमदारांनी त्याच्यांशी अयोग्य वर्तन केले आणि त्यांचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला आणि त्यांना कार्यालयाबाहेर काढले. त्यानंतर ते एमएच-40, 6579 या गाडीत बसले. महिलांना धडक देत ही गाडी पुढे गेली.
 
वाद वाढल्यावर महिलांचे आंदोलन
आमदाराच्या वाहनाने धडक दिल्यावर महिला आक्रमक झाल्या. त्यांनी तेथेच धरणे देण्यास सुरवात केल्यावर पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी महिलांना पोलिस ठाण्यात नेले. त्यावेळी महिलांनी आमदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी आमदारांविरोधात कलम 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला. तर महिलांविरोधात कलम 504, 507 नुसार गुन्हा दाखल केला. 
 
आमदारांचे म्हणणे
आमदार रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी महिलांचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्यावर त्यांनी धरणे आंदोलन केले. आपण पोलिसांना फोन केल्यावर ते घटनास्थळी आले.
 
पुढील स्लाईड पाहण्यासाठी क्लिक करा
 
बातम्या आणखी आहेत...