आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार रमेश कदम यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांना १३ आॅगस्ट रोजी पुण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुलडाण्यात चौकशीसाठी आणले होते. त्यांनतर न्यायालयात उभे केले असता कदम यांना १८ ऑगस्टपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी त्यांना न्यायालयात उभे केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

ऑगस्ट २०१२ ते डिसेंबर २०१४ या काळात आमदार कदम हे महामंडळाचे अध्यक्ष असताना महामंडळात कोट्यावधी रुपयांच्या निधीचा घोटाळा झाला होता. या प्रकरणी त्यांच्याविरूद्ध गुन्हा अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला होता. या घोटाळयाची साखळी बुलडाण्यापर्यत पोहोचल्याने चौकशीसाठी कदम यांना पुण्याच्या पथकाने बुलडाण्यात आणले होते. दरम्यान, पोलिसांनी त्यांना कोठडीत असताना व्हीआयपी सुविधा पुरवल्याचे बुलडाण्यात बोलल्या जात होते, तर अजिंठा रोडवरील एका ढाब्यावरून विशेष जेवणही पुरवल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...