आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3162 जोडप्‍यांसोबत या आमदाराचेही झाले होते लग्‍न, 1000 पोलिसांना आवरत नव्‍हती गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्यावरुन आमदार रवी राणा व अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्‍यात वाद पेटला. राणा यांनी पोटेंबाबत वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केल्‍याने संतप्‍त भाजपा कार्यकर्त्‍यांनी राणा यांचे कार्यालय फोडले. जिल्‍ह्यातील या दोन्‍ही लोकप्रिय नेत्‍यांचे समर्थक रस्‍त्‍यावर उतरले. त्‍यामुळे आमदार राणा चर्चेत आले आहेत. 2011 मध्‍ये रवी राणा आणि अभिनेत्री नवनीत कौर यांचा शाही लग्‍नसोहळा महाराष्‍ट्राने पाहिला होता. त्‍यातील काही बाबी यानिमित्‍ताने सांगत आहोत.

आमदार रवी राणा आणि अभिनेत्री नवनीत कौर यांच्‍या शाही लग्‍नसोहळ्याची अनुभूती
अमरावतीकरांनी अनुभवली होती. 2 फेब्रुवारी 2011 रोजी झालेल्या या सामूहिक विवाह
सोहळ्यात 3162 जोडप्यांनी लग्न केले होते. त्यात 2443 हिंदू, 739 बौद्ध, 150 मुस्लिम, 15 ख्रिश्चन आणि 13 अंध जोडप्यांचाही समावेश होता. बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्‍गज या लग्‍नसोहळ्यात उपस्‍थित होते.
रामदेव बाबांच्या आश्रमात झाली रवी राणांची भेट....
- नवनीत यांना योगाची आवड आहे. त्या योग गुरु रामदेव बाबा यांच्या शिष्य आहेत.
- पती रवी राणा हे देखील रामदेव बाबांना मानतात.
- रामदेव बाबा यांच्या एका शिबीरातच रवी राणा आणि नवनीत यांची भेट झाली होती.
- त्यानंतर दोघांनी रामदेव बाबांच्या परवानगीनेच नाते संबंध वाढविले.
- 2011 मध्ये लग्न झाल्यानंतर नवनीत यांनी चित्रपटांना रामराम केला.
- तत्‍कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योग गुरू रामदेव बाबा, सहारा प्रमुख सुब्रतो
- रॉय यांच्यासह बॉलिवूडमधील विवेक ओबेरॉय या लग्‍नसोहळ्यात सहभागी होते.
- "इंडिया बुक ऑफ रेकॉड', "लिमका बुक ऑफ रेकॉर्ड' तसेच "आशिया बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये या सोहळ्याची नोंद झाली होती.

नवनीत सापडल्‍या होत्‍या वादात....
लग्‍नापूर्वी चित्रपट अभिनेत्री असलेल्‍या नवनीत राणा लग्‍नानंतर राजकारणात आल्‍या. यांनी मार्च 2014 मध्‍ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर अमरावतीत लोकसभा निवडणूक लढवली होती. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव होता. त्यावेळी विरोधी उमेदवारांनी त्यांच्यावर खोटे जात प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर स्थानिक न्यायालयाने मुंबई पोलिसांना या प्रकरणी एफआयआर दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, या लग्‍नसोहळ्याबाबत काही खास बाबी....