आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप अामदार ताेडसामविराेधात शेकडाे कंत्राटदार रस्त्यावर; काम न करण्याचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- यवतमाळ येथील शासकीय कंत्राटदार एस. एल. शर्मा यांनी आमदार राजू तोडसाम यांच्याकडून अापल्याला धमकी अाल्याची तक्रार पाेलिस ठाण्यात दाखल करण्यात अाली अाहे. दरम्यान, ताेडसाम यांच्याविराेधात विदर्भातील सर्व कंत्राटदार एकवटले असून त्यांनी अामदाराच्या दादागिरीचा शुक्रवारी निषेध नोंदवला अाहे. ‘कंत्राटदाराला पैशाची मागणी करणाऱ्या तोडसाम यांच्याविरूद्ध मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, ताेपर्यंत संपूर्ण विदर्भात एकही कंत्राटदार शासकीय काम करणार नाही,’ असा इशाराही देण्यात अाला.

जीएसटी, रजिस्ट्रेशन व इतर मागण्यांसाठी  एका महिन्यापासून राज्यातील विविध कंत्राटदार संघटनांनी शासकीय निविदा भरण्यावर  बहिष्कार टाकला अाहे. याच मागणीसाठी विदर्भातील हजारो कंत्राटदारांनी शुक्रवारी नागपूर येथील संविधान चौकात धरणे आंदोलन केले. नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, वणी, येथून आलेले तब्बल अडीच हजार कंत्राटदार या अांदाेलनात सहभागी झाले हाेते. या  वेळी अामदार ताेडसाम यांच्या दादागिरीचा निषेधही करण्यात अाला. तसेच सरकारने नवीन निविदा काढताना त्यातील प्रत्येक बाबींवर  जीएसटी रक्कम लावूनच अंदाज पत्रक तयार करावे, सामायिक दरसुचीमध्ये जीएसटीची रक्कम पकडण्यात यावी, सध्याच्या सामासिक दरसूचीतील तांत्रिक चुका दुरूस्त कराव्यात, रेती, गिट्टी, विटा यांचे दर प्रादेशिक स्तरावर जिल्हानिहाय ठरविण्यात यावे, सामाईक दरसुची तयार करताना प्रत्येक असोसिएशनचा प्रतिनिधी संबंधित समितीत घेण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या. 

हे तर माझ्या विरोधात षडयंत्र : तोडसाम
शासकीय कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांनी कोलामपुढा येथे अतिशय निकृष्ट काम केले. या  कामाचा दर्जा सुधारावा यासाठी मी  संबंधित विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांच्या समोरून माेबाइलवरुन शर्मा यांना बाेललाे. मात्र त्यांनी मला उलटसुलट उत्तर देत पैसे मागितल्याचा आरोप माझ्यावरच केला, असे स्पष्टीकरण आमदार राजू तोडसाम यांनी दिले. दरम्यान, भाजपला सत्तेची केवढी मस्ती चढली अाहे हे अामदार ताेडसाम यांच्या बाेलण्यावरुन लक्षात येते, अशी टीका अामदार बच्चू कडू यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...