आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुणाच्या खून प्रकरणात आमदारपुत्र अद्याप फरार, दोघांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - बिअर बारमध्ये धुमाकूळ घालून बारमालकाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंबाझरी पोलिसांना हवा असलेला आमदारपुत्र रोहित खोपडे व त्याचे २ ते ३ साथीदार अद्यापही फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली.

उपराजधानी नागपुरातील राजकीय वर्तुळात सध्या हे प्रकरण गाजत अाहे. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांचे पुत्र रोहित आणि अभिजित हे दोघे आपल्या दोन मित्रांसह रविवारी रात्री शंकरनगर चौकातील क्लाऊड सेव्हन बिअर बारमध्ये पार्टी करायला गेले होते. तेथे भरपूर दारू प्यायल्यावर त्यांनी जेवणही केले. वेटरने बिल दिल्यावर अभिजित खोपडे याने बिलात डिस्काउंट देण्याची मागणी केली. बारमालक सावन ऊर्फ सनी बमब्रोतवार (२१, रा. गांधी चौक, सदर) याने मात्र त्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या अभिजित त्याच्या साथीदारांनी बारलकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. दाेन्ही गटात हुज्जत सुरू असताना खोपडे बंधूंचे आणखी काही मित्र तेथे पोहोचले. त्यावर अधिकच जाेर चढलेल्या खोपडे बंधूंनी दारूची बाटली बारमालक सावन बमब्रोतवार याच्या डोक्यावर फोडून त्याला जखमी केले. त्यांच्या इतर साथीदारांनीही बारमालक सावन याला बेदम मारहाण केली, तसेच हाॅटेलात ताेडफाेड करून माेठ्या प्रमाणावर नुकसान केले. या घटनेनंतर खाेपडे बंधूंसह त्यांचे साथीदार बारमधून निघून गेले. त्यानंतर सावन बमब्रोतवार याने साथीदारांसह खोपडे बंधूवर हल्ला चढवला. यात शुभम यांचा मृत्यू झाला. अंबाझरी पोलिसांनी या प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी बारमालकावर हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात खोपडे बंधूंपैकी अभिलाष हा जखमी असल्याने त्याच्यावर लकडगंज परिसरातील किंमतकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी या प्रकरणातील अक्षय लोढे आणि स्वप्निल देशमुख या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले, तर रोहित खोपडे व त्याचे काही साथीदार अद्यापही फरार असल्याची माहिती अंबाझरी पोलिसांनी दिली. खुनाच्या प्रकरणात बारमालकासह पाच जणांना अंबाझरी पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. दरम्यान, ही घटना घडली त्या वेळी बारमधील सीसीटीव्हीत या संपूर्ण घटनेचे चित्रण झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...