आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांच्या वाहनांनाही विधिमंडळ परिसरात प्रवेशबंदी, पहिल्यांदाच मंत्र्यांसह आमदारांची पदयात्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळ परिसरात हमखास प्रवेश करणाऱ्या आमदारांची महागडी वाहने किंवा लाल दिव्यांचा झगमगाट असलेल्या डीव्ही कार यंदा दिसल्याच नाहीत अाणि अधिवेशन संपेपर्यंत दिसणारही नाहीत. कारण सुरक्षेच्या कारणावरून मंत्री आणि आमदारांच्या वाहनांना विधिमंडळ परिसरात प्रवेश नाकारण्यात आला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्वच आमदार आणि मंत्र्यांना त्यांची वाहने परिसराच्या बाहेर पार्किंग करून त्या विधिमंडळाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सर्वांनाच पायी चालत यावे लागले. शिस्तप्रिय असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी स्वत:पासून या नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीला सुरुवात केली.
अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी मुख्यमंत्र्यांंच्या वाहनाचा ताफा आला. मात्र, हा ताफा विधिमंडळ परिसराच्या मागील प्रवेशद्वारासमोरच थांबला. तेथून मुख्यमंत्री आणि त्यांचे अन्य सहकारी शंभर मीटरचे अंतर पायी चालत आले. पायी चालण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारापासून ते आतपर्यंत लाल रंगाचे कारपेट अंथरले आहे. मागील वर्षीपर्यंत आमदार आणि मंत्र्यांची वाहने विधानसभेच्या पायऱ्यांनजीक येऊन थांबायची. तेथे संधीत मंत्री अथवा आमदार उतरायचे आणि थेट विधानसभेच्या पायऱ्या चढायचे. मात्र, या वेळी सुरक्षेच्या कारणावरून विधिमंडळ परिसरात कोणत्याही वाहनाला प्रवेश देण्यात आला नाही. अधिवेशन संपेपर्यंत वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही, असे विधिमंडळ परिसरातील सुरक्षा अधिकाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
बातम्या आणखी आहेत...