आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राला भिकेला लावणारे शिवसेना आमदार तानाजी सावंतांविरोधात MNS आक्रमक, पुतळा जाळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवसेनेचे विधानपरिषदेच्या आमदारांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी आमदार सावंत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन त्यांचा निषेध केला. 
 
काय केले होते सावंतांनी 
- शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार तानाजी सावंत यांनी महाराष्ट्राबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. 
- ते म्हणाले होते, ' मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही.' 
- जिल्हा परिषद निवडणूक प्रचारादरम्यान भाषण करताना त्यांनी हे वक्तव्य केल्याचा दावा केला जात आहे. 
- सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 
- तानाजी सावंत यवतमाळमधून शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार आहेत. 
- मनसेने त्यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. 
- वास्तविक सावंतानी त्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. पूर्ण भाषण ऐकल्यानंतर संदर्भ लक्षात येईल असेही ते म्हणाले होते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...