आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले शहरात ‘भीक मांगो’ आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - जिल्ह्यातील भाजपा आमदार राजू तोडसाम, शिवदत्त शर्मा नामक ठेकेदाराची कथीत ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये आमदार तोडसाम थेट कंत्राटदाराला आपल्या मतदार संघातील कामाबाबत दम देत असल्याचा आरोप ठेकेदाराने केला आहे. या विरोधात महाराष्ट्र नविनर्माण सेनेच्या वतीने आज, दि. १३ सप्टेंबर रोजी शहरातील स्थानिक दत्त चौकात भीक मांगो आंदोलन केले. 
 
संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छ कारभार स्वच्छ सरकारचा नारा देणारे भाजपाच्या आर्णी मतदार संघातील राजू तोडसाम यांनी हरताळ फासले. कामावरून ठेकेदाराला चक्क धमकाविण्याचे प्रकरण समोर येऊन आज आठ दिवसांचा कालावधी लोटल्या गेला आहे. त्या अनुषंगाने वडगाव रोड पोलिस ठाण्यात तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली आहे. असे असले तरी जिल्हा पोलिस प्रशासनाने अद्यापपर्यंत कुठल्याच प्रकारचे पावले उचलले नाही. या प्रकरणात पोलिस प्रशासन मुग गिळून बसल्याचा आरोप मनसेने केला आहे. 

दरम्यान, आज, दि. १३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील नेताजी चौकातून मार्गक्रमण करीत दत्त चौक मार्गे शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाच नामधारी प्रतिकात्मक तोडसाम तयार करून त्यांनी शहरातील प्रतिष्ठानात जावून भीक मांगो आंदोलन केले. या आंदोलनाला सर्व सामान्य जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला रोष आमदारांना एक रूपया, दोन रूपये, पाच रूपये, दहा रूपये देऊन व्यक्त केला. या आंदोलनात ४०४ रूपये भिक स्वरूपात जमा झाले, हे पैसे मुख्यमंत्री निधीला पाठवण्यात येणार आहे. यावेळी गेट वेल सून म्हणून मुख्यमंत्र्यांना संदेश पाठवण्यात आला आहे. या आंदोलनात अनिल हमदापूरे, देवा शिवरामवार, संगीता घोडमारे, गजानन भालेकर, अब्दुल साजीद, सचिन येलगंधेवार, अभिजीत नावटकर, अजय गोडबोले, पराग बारले, संदीप भिसे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
बातम्या आणखी आहेत...