आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धामणगावात 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर जाळपोळ; पैशाअभावी उपचार थांबवल्याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/अमरावती-  धामणगाव येथे उपचारादरम्यान दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी जाळपोळ केली आहे. निधी प्रशांत ठाकरे, असे मृ्त्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. निधी ही कावली वसाड या आपल्या मामाच्या गावी दिवाळीच्या निमित्ताने आली होती. पोटात दुखत असल्याने तिला धामणगाव येथील डॉ. अशोक सकलेचा यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले मात्र पुढील उपचारासाठी पैसे कमी असल्याने नंतर तिच्यावरील उपचार डॉ. सकलेंनी थांबवले. धामणगाव येथील अभिषेक रुग्णालयामध्ये निधीचा  आज सकाळी मृत्यू झाला. यामुळे ग्रामस्थ संतापले. त्यांनी डॉ. सकलेचा यांचे वाहन व काही साहित्य बाहेर आणून जाळले. धामणगाव येथे तणावाचे वातावरण असून सकले यांना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. जाळपोळ केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...