आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दामिनी’ सह ‘मोबाईल गस्ती’चे काम असमाधानकारक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील महिला, युवती, विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे विशेष असे ‘दामिनी’ पथक तैनातीला आहे. या पथकात जवळपास १२ कर्मचारी, अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र त्यांचे काम समाधानकारक नाही. तसेच शहरातील गुन्हेगारी, छेडछाडीच्या घटना कमी व्हाव्यात म्हणून सातत्याने गस्त घालणाऱ्या मोबाईल व्हॅनमधील कर्मचारी सुद्धा प्रभावी कामगिरी करत नसल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे. त्यांना सोपवून दिलेली जबाबदारीच ते पार पडत नसल्याचे या वेळी आयुक्तांनी सांगितले.

शहरात गस्तीसाठी पोलिसांना शासनाने ‘आर्टीका’ कार दिल्या आहेत. या कारचा उद्देश नागरिकांना पोलिसांची तत्परतेने सेवा मिळावी, गुन्हेगारीवर अंकुश राहावा हा आहे. त्याच हेतूने शासनानेसुद्धा दिल्या आहेत. मात्र सद्या शहरात या कारद्वारे सुरू असलेल्या गस्त प्रभावी नाहीत. अनेकांना तर आरामासाठीच या कार असल्याचे चित्र आहे. पोलिस आयुक्तांनी हा प्रकार लक्षात आल्यामुळे त्यांनी मोबाईल व्हॅनमधील कर्मचाऱ्यांना गस्तीसोबतच रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पकडणे यासह १० कामे सोपवली होतीे. तीन महिन्यांचा अहवाल त्यांना प्राप्त झाला असून, एकाही मोबाईल व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी हे काम केलेले नाही. या व्हॅनच्या कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक काम होत नसल्याचे आयुक्तांनी सांगितले. याचवेळी दामिनी पथकातील १२ कर्मचारी अधिकारीसुद्धा प्रभावी काम करत नाही. त्यामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावला आहे. आगामी काळात यापेक्षाही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. कारण या पथकात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी पीएसआय प्राजक्ता घावडे यांचेच काम उत्कृष्ट आहे, असेही पोलिस आयुक्तांनी सांगितले. शहरात विनयभंगाच्या घटनांत वाढ झाली. ज्या गुन्हेगारांविरुद्ध विनयभंग बलात्कारासारख्या कलमान्वये गुन्हे दाखल आहे, अशा गुन्हेगारांना वारंवार पेशीसाठी आयुक्तालयात हजर राहावे लागणार आहे. एकप्रकारे हे गुन्हेगार आता पोलिसांच्या ‘रेकॉर्ड’वर येणार आहेत. या नव्या पद्धतीला आयुक्तालयात प्रारंभ झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...