आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Means Not Nationa And Sangh Not Parliament Kanhaiya Kumar

मोदी म्हणजे देश अन‌् संघ म्हणजे काही संसद नव्हे, कन्हैया कुमारची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - डाॅ. आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी नागपुरात येऊन संघ, भाजप व माेदींना लक्ष्य केले हाेते. त्यापाठाेपाठ गुरुवारी ‘जेएनयू’तील विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनेही ‘संघभूमी’त येऊन संघ व माेदींवर कडाडून हल्ला चढवला. ‘मोदी म्हणजे देश नाही, संघ म्हणजे संसद नाही आणि मनुस्मृती म्हणजे राज्यघटना नाही,’ असे त्याने ठणकावून सांगितले.

अांबेडकर जयंतीनिमित्त नागपुरात अालेल्या कन्हैयाकुमारने दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांसमाेर भाषण केले. ‘सत्तेेवर येण्यापूर्वी माेदींनी लोकांना भरमसाट आश्वासने दिली, भुलवणारी स्वप्ने दाखवली. पण प्रत्यक्षात एकाही आश्वासनाची आणि स्वप्नाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे देशातील लोकांमध्ये नाराजी आहे. त्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी, आपले अपयश झाकण्यासाठी संघ आणि मोदी देशभक्तीचे राजकारण करीत आहेत,’ असा अाराेपही त्याने केला.

‘हरियाणा सरकारने गुडगावचे ‘गुरुग्राम’ नामकरण केले. त्यांना द्रोणाचार्यांविषयी खूप प्रेम आहे. पण द्रोणाचार्यांनी एकलव्याचा कापलेला अंगठा परत केलेला नाही हे आम्ही विसरलेलो नाही. केवळ नारे देऊन, खोटी आश्वासने देऊन आणि गणवेश बदलून देश बदलत नाही. त्यासाठी दृष्टी हवी. केवळ गणवेश बदलल्याने दृष्टी बदलत नाही,’ असा टाेलाही त्याने संघाला लगावला. ‘जेएनयू’मध्ये कधीच देशविरोधी कारवाया होत नाहीत. आम्हाला बदनाम करण्यासाठी सरकारचे मिंधे असलेल्या एका चॅनलमालकाला हाताशी धरून बनावट व्हिडिओ तयार करण्यात आला. त्यासाठी चॅनलमालकाला राज्यसभेवर घेण्याचे आश्वासन देण्यात आले. जेएनयू आणि तेथील िवद्यार्थी संघटनेला ठरवून बदनाम करण्यात येत आहे,’ असे सांगत त्याने अापल्यावरील देशद्राेहाच्या अाराेपांचे पुन्हा खंडन केले. ‘ब्राह्मणवाद, मनुवाद आणि जातीयवादाला पराभूत केले तरच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळेल. त्यासाठी आम्हाला जनआंदोलन उभारावे लागेल आणि त्यासाठी सर्वांनी एकजूट हाेण्याची गरज अाहे,’ असे अावाहनही त्याने उपस्थितांना केले.

पुढे वाचा... काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची उपस्थिती, गरिबांसाठी यात्रा का नाही?