आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेदींनी नोदाबंदीप्रमाणे संपूर्ण देशातच दारूबंदी लागू करावी : मेधा पाटकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- देशात दारूमुळे दरवर्षी १० लाखांवर लोकांचा मृत्यू होतो. महाराष्ट्रात २० हजारांवर लोक दारूच्या व्यसनाचे बळी ठरतात. हे लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोदाबंदीप्रमाणे संपूर्ण देशातच दारूबंदी लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर व बंधुअा मुक्ती मोर्चाचे नेते स्वामी अग्निवेश यांनी बुधवारी केली. नशामुक्त भारत आंदोलनाच्या राष्ट्रीय संमेलनात नागपुरात अालेल्या या दाेघांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली.  
 
नशामुक्त भारतासाठी लोकचळवळ उभारण्याचे आमचे प्रयत्न असून त्यासाठी शाळा-महाविद्यालये तसेच शिक्षकांशीही संपर्क साधत आहोत. मुलांना शालेय जीवनापासून या बाबत शिक्षित करणे गरजेचे आहे, असे पाटकर म्हणाल्या. दारूबंदी करण्याची महाराष्ट्रासह कोणत्याच सरकारची मानसिकता नाही. मध्य प्रदेश व छत्तीसगड ही भाजपाची सरकार असलेली राज्ये दारूबंदीचा केवळ गवगवा करीत आहे. 

तर महानगरांतून जाणारे महामार्ग व राज्यमार्ग तेथील विकास प्राधिकरणांकडे हस्तांतरित करण्याची पळवाट महाराष्ट्र सरकार शोधीत असल्याची टीका पाटकर यांनी केली. दारू दुकाने सुरू राहण्यात राजकारण्यांचे स्वारस्य असल्याने या कायद्याची कडक अंमलबजावणी होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. नर्मदा धरण मोदींनी पूर्ण केले असून या धरणाचे दरवाजे आता बंद होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाला ते चुकीची माहिती देत आहे. भूमिहीनांना अजून त्यांच्या जमिनी मिळालेल्या नाही. महाराष्ट्रातही सुमारे ५०० लोकांचे पुनर्वसन झालेले नाही, असे पाटकर म्हणाल्या.  

दाेन अाॅक्टाेबरपर्यंत दारुबंदी करा : अग्निवेश
स्वामी अग्निवेश म्हणाले, ‘१९६८ पासून आम्ही दारूबंदीसाठी लढत आहो. आतापर्यंत आठ वेळा जेलमध्ये गेलो. येत्या २ आॅक्टोबरपूर्वी संपूर्ण देशात दारूबंदी लागू झाली नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल.  दारूबंदी करण्यास सरकार अपयशी ठरल्यास लोक स्वत:च दारूबंदीसाठी पुढाकार घेतील, असा इशाराही त्यांनी दिला. मुसलमान कधीच गोहत्येचे समर्थक नव्हते. या विषयाला उगाच जातीय रंग देऊ नये’, असे अावाहनही अग्निवेश यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...